उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली दि.०५:- ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अल्लाउद्दीन काझी हे सांगली विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीत उभे राहिले आहेत. आणि मिरज विधानसभा मतदारसंघात अधिकृत उमेदवार विज्ञान माने, तसेच तासगाव/कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवार दत्तात्रय आठवले उभे राहिले आहेत यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते तथा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा उपाध्यक्ष किशोर केशव आढाव यांनी प्रचार दौरा काढून तिन्ही विधानसभा मतदार संघांतील गावाना भेटी देऊन घर टू घर प्रचार सुरू केला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवारांना मतदान करण्यासाठी पक्षाची भूमिका मांडत असतात सांगितले की, एस.सी, एस.टी, ओबीसीचे आरक्षण संपविण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांनी छुपी युती केली आहे. हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक सापनाथ तर दुसरा नागनाथ आहेत. अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर मागासवर्गीय लोकाचे काही घेणे देणे नाही. त्यांना त्यांचे फक्त मते पाहिजेत. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय घेतला आहे, एससी, एसटीच्या आरक्षणाला क्रिमिनल करून आरक्षणातून बाहेर काढण्याचे डावपेच आखले जात आहेत क्रिमिनल हे परंपरागत खितपत पडलेल्यांचे आरक्षण संपविण्याचे यंत्र आहे. सद्या ओबीसी आरक्षणात क्रिमिनल आणून ओबीसीचे आरक्षण निकामी करण्यात आले आहे. यावेळी आपले आरक्षण आपण वाचवायचे आहे. यासाठी ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी यांच्या उमेदवारांना आपले बहुमोल मतदान करून विधानसभेत पाठवायचे आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, आपल्या मुस्लिम बांधवांची मते हावी आहेत परंतु त्यांना इथल्या कोणत्याही प्रस्थापित पक्ष उमेदवारी देत नाही. मुस्लीम समाजातील हिताचे निर्णय घेण्यासाठी समाजातून लोकप्रतिनिधी विधानसभेत आला पाहिजे. या करिता ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी मुस्लीम समाजातील उमेदवारांना १७ ठिकाणी उमेदवारी दिली आहे. ही एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे सोने करणे हे आता समाजाच्या हातात आहे. आता हि न्याय हक्काची लढाई रस्त्यावर लढता लढता आता विधानसभेत आपला हक्काचा उमेदवार पाठवू लढली पाहिजे. या करिता ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. आपल्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा. असे आवाहन वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्यातील जेष्ठ नेते तथा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा उपाध्यक्ष किशोर केशव आढाव यांनी प्रचार दौराच्या वेळी केले. या वेळी समाज बांधव, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.