निष्पाप गायीच्या मृत्युची जबाबदारी तथाकथित “शेतकरीपुत्र” घेणार का? नागरिकांचा प्रश्न.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक ४ नोव्हेंबरला हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील पोहना या गावात राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट व महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल वांदिले यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत उपस्थित लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थित नागरिकांचे जेवणावळी झाल्यानंतर उरलेले अन्न हे आयोजन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उघड्यावर फेकून दिले नेत्यांनी व लोकांनी जेवण आटोपून परतीचा प्रवास धरला मात्र नियोजनशुन्य व्यवस्थेतून आज गाय हे उघड्यावरील अन्न खाऊन मृत्यूच्या दाढेत लोटल्या गेली याला जबाबदार कोण? स्थानिक आयोजन समिती की उमेदवार अतुल वांदिले? याचे उत्तर सोशल मीडियावर आभाळ पेलणाऱ्यां महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी द्यावे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल वांदिले यांच्या जाहीर सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी आपुलकीचा पुळका आणून शेतकऱ्यांवर पुष्पांचा वर्षाव करून मीच तुमचा तारणहार म्हणजेच शेतकरी पुत्र आज घटना होऊन काही तासांचा अवधी लोटला गेला तरी चकार शब्द बोलले नाहीत हे अतिशय निंदनीय आहे. ग्रामीण भागातील जाहीर सभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलून खोटेनाटे आरोप प्रत्यारोप करणारे जिल्ह्याचे खासदार अमर काळे सुद्धा या सभेमध्ये मंचावर उपस्थित होते आणि नितेश कराळे मास्तर सुद्धा मंचावर उपस्थित होते.
सभा झाल्यानंतर संबंधित घटना ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सुद्धा चकार शब्द बोलले नाही की, यावर साधी प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केली नाही. ही अतिशय खेदाची आणि संताप देणारी बाब आहे. मी शेतकरी पुत्र असे फक्त या निवडणुकीत बिरुदावली स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लावून घेत ग्रामीण भागात प्रचार-अपप्रचार करणारे महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल वांदिले यांनी सदर घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गाय मालकाची विचारपूस तरी केली काय?
स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही राजकीय सभा ग्रामीण भागात घेता. नियोजनशून्य कारभारातून अन्न उघड्यावर टाकून देत मुक्या प्राण्यांच्या नाहक बळी तुमच्या व्यवस्थेने घेतला याची जबाबदारी कोण घेणार? फक्त भाषणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विषयी व्यक्त होऊन खोटा पुळका फक्त तुम्हाला निवडणूकी पुरताच येतो काय? ता प्रश्नाचे उत्तर देणार कोण? संबंधित गाय मालकाचे तुमच्या निष्काळजीपणाने ५० हजार ते १ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्याचा गोधनाची हत्या या महाविकास आघाडीच्या उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली असेच आज खेदाने आणि संतापाने म्हणावे लागेल.
निवडणुका येतील जातील परंतु आपल्या स्वार्थासाठी मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खडळण्याचा अधिकार ना तुम्हाला आहे, नाही या पृथ्वीवर असलेल्या कुठल्याही मानवजातीला आहे. आपण निवडणूक लढतो प्रचार करतो तो एक लोकशाहीचा भाग आहेत. पण आपण जे कृत्य करतो आहे त्याची जबाबदारी सुद्धा तेवढ्याच तत्परतेने घेण्याची वृत्ती अंगी बाळगली पाहिजे. सत्ताधारी पक्ष असो की विद्यमान आमदार असो यांच्यावर आपण ज्या अविर्भावातून टीकाटिप्पणी करतो. आरोप प्रत्यारोप करतो तेव्हा आपली चुकी सुद्धा मान्य करता आली पाहिजे तरच दुसऱ्यांवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे.
ग्रामीण भागात प्रचारसभेत होणाऱ्या भाषणात तुम्ही जेव्हा त्यांच्यावर आरोपांच्या फैऱ्या झाडत आहेत आणि स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवून घेत आहेत तर त्या निष्पाप राज्यमाता गाय मालक शेतकऱ्यांवर आज जे गायीच्या मृत्यूने संकट कोसळले तेही तुमच्या निष्काळजीपणामुळे तर मग त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून तुम्ही स्वतःला शेतकरी पुत्र कसे म्हणवून घेत आहेत? याचे उत्तर तुम्ही द्यायला हवेच.
फक्त राजकीय स्वार्थासाठी जर का? शेतकऱ्यांविषयी पुळका आणून जर तुम्ही वागत असाल तर ग्रामीण भागातील शेतकरी बांधव सुद्धा तेवढाचं तत्पर आहेत तुम्हाला तुमची जागा दाखवून देण्यासाठी. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी मतदार बांधवांना मी आव्हाहन करतो आहे की, शेतकऱ्यांविषयी खोटा पुळका आणून राजकीय स्वार्थासाठी तुमचा भ्रमनिरास करणाऱ्या तसेच पोहना येथील शेतकरी बांधवांच्या गायीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या तथाकथित शेतकरी पुत्राच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता येत्या 20 नोव्हेंबरला त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी तत्पर राहावे. असे मत राहुल रमेशराव दारुणकर प्रदेश अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता युवा परिवर्तन की आवाज संघटना महाराष्ट्र राज्य