युवराज मेश्राम, प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन सावनेर:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यात सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदार संघात जोरदार टक्कर बघायला मिळत असून डॉ.अमोल देशमुख यांनी मतदार संघात झंजावत दौरे सुरू केले आहे. त्यामुळे ते प्रचारात आघाडीवर दिसून येत आहे.
सावनेर कळमेश्वर विधानसभा निवडणुकीत युवा असलेले डॉ. अमोल देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हापासून झंजावत प्रचार दौऱ्याची सुरुवात झाली. सर्वप्रथम त्यांनी आदासा गणपती देवस्थान येथे नारळ फोडून प्रचाराला झंझावत दौऱ्याला सुरुवात केली.
डॉ.अमोल देशमुख यांनी आदासा, सोनपुर, बोरगाव, धापेवाडा, निलगाव, सावनेर शहर, मंगसा, केळवद, खापा, गडेगाव, आजणी, शेरडी, कोदेगाव, कवठा, पाटनसावंगी, वाकोडी, वाकी, बडेगाव व इतर गावात झंजावत दौऱ्याला सुरुवात झाली आहे.
सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील ज्याही गावात डॉ.अमोल देशमुख जातात त्या त्या गावांमध्ये त्यांचे जंगी स्वागत होत आहे. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात पाऊल ठेवणारे सावनेर कळमेश्वर विधानसभेतील उदयोन्मुख तरुण डॉ.अमोल देशमुख आगामी विधानसभा निवडणुकीत उतरल्याने चांगली समीकरणे बिघडू लागली आहेत. ते आपल्या प्रचाराच्या कामात व्यस्त आहेत आणि दररोज प्रत्येक गावात जाऊन मतदारांना स्वतःची ओळख करून देत आहेत आणि ही निवडणूक लढवण्याचे कारण सांगत आहेत.
डॉ.अमोल देशमुख हे माजी आमदार रणजित देशमुख यांचे पुत्र असून ते उच्चशिक्षित आहे. गोरगरिबांच्या, कामगारांच्या समस्या, जनसामान्य जनतेच्या प्रश्नाला घेऊन लढणारे डॉ.अमोल देशमुख जनतेत आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असल्याचा लाभ त्यांना मिळणार आहे. गावागावात त्यांचे स्वागत व आशीर्वाद मिळत आहे.
यावेळी महाराष्ट्र संदेश न्युजशी बोलताना डॉ.अमोल देशमुख म्हणाले की, येत्या २० नोव्हेंबरला सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदार संघात मतदार राजा माझ्यावर विश्वास दाखवणार आहे. मी पण शेतकरी, कामगार, मजूर, विध्यार्थी, महिला सुरक्षा आणि सर्व सामान्य नागरिकांचे महत्वपूर्ण प्रश्न ऐरणीवर आणणार असून त्यामुळे मतदार संघाचा विकास साधण्यासाठी मला विजयी कराल ही अपेक्षा बाळगतो असे डॉ.अमोल देशमुख म्हणाले.