प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात भाजपाचे अधिकृत उमेदवार समीर कुणावार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा घेतली. यावेळी नितीन गडकरी यांनी जोरदार भाषण करून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
नितीन गडकरी म्हणाले की, आमदार समीर कुणावर यांच्या नेतृत्वात मागील १० वर्षांत हिंगणघाट मतदारसंघात पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, आणि आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय विकास झाला आहे. समुद्रपूरच्या जनतेने सर्वच क्षेत्रांत या विकासाचा अनुभव घेतला आहे. विकासाची ओढ असलेल्या इथल्या जनतेने यावेळीही बहुमताने भाजप-महायुतीला विजयी करेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रीपाई(आ) नेते विजय आगलावे, माजी खासदार वर्धा रामदास तडस, प्रदेश उपाध्यक्ष रा.काँ. पार्टी (अ.प.) दिवाकर गमे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच समीर कुणावार यांचा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प.) रिपाई (आ) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच असंख्य नागरिकांनी या विराट सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.