*कार्यक्रमाचे उदघाटक प्राचार्य जय फुलझेले यांचे हस्ते तथागत भगवान बुद्ध व डॉ, बाबासाहेब आंबेडकर महामानवाला वंदन करून दिप प्रज्वलीत करण्या आले*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
आरमोरी येथे पंचशील बुद्ध विहारात,भारताचे विद्यापीठ रमाई महाकाव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा
सौ.संगीता वाल्मीक रामटेके /पाटील यांनी आयोजित केला होता. भारताचं विद्यापीठ रमाई महाकाव्यग्रंथाचे
संपादक प्रा. डॉ . अशोककुमार दवणे नांदेड यांनी संपादन केलेल्या रमाई महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन
सामाजिक कार्यकर्त्या उपासिका भूमिका बागडे यांचे हस्ते करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्यातचे उद्घाटक
आयु. प्राचार्य जय फुलझेले आरमोरी यांचे हस्ते तथागत भगवान बुद्ध, डॉ .बाबासाहेब आंबेडकर मानवाला वंदन करून दीप प्रज्वलीत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद
उपासिका लता बरसागडे यांनी भूषविले.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून
आयु. उपासिका मीना सहारे
आयु.इंदुरकर सर सा.कार्यकर्ता
आयु.रोडगे सर सा.कार्यकर्ता
आयु.सिद्धार्थ साखरे सर सा.कार्यकर्ता
आयु. बारसागडे सर सा.कार्यकर्ता
उपासिका शेंडे मॅडम
उपासिका पौर्णिमा पाटील, वणी
इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
सामाजिक कार्यकर्ती कवयित्री साहित्यिक सौ.संगीता वाल्मीक रामटेके/ पाटील ह्यांनी केले.महाकाव्य ग्रंथाचा इतिहास अजरामर व्हावा,रमाईच्या जीवनावरील अनमोल. दस्ताऐवज हा रमाई महाकाव्य ग्रंथाची प्रथमच निर्मिती करण्यात आलेली असून,महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यामध्ये १५० ठिकाणी एकाच दिवशी १० नोव्हेंबर रोजी प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.याभारताचं विद्यापीठ रमाई महाकाव्यग्रंथात 3६९ कवी कवियत्रिच्या कवितांता समावेश आहे.गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 11 कवी कवियत्रीच्या कविता रमाई महाकाव्यग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
अध्यक्षा
लता बरसागडे मॅडम म्हणल्या..ह्या ग्रंथात रमाई जीवनावर कवीनी आपल्या रचना ,शब्दबध्द केल्या आहेत. हा ग्रंथ वाचनीय आहे तो सर्वांनी वाचावा.
जय फुलझेले प्राचार्य यांनी. रमाई महाकाव्य ग्रंथात बाबत
इतिहासात अजरामर होणारा हा महाकाव्य ग्रंथ आहे प्रथमच रमाई ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे याची इतिहास नोंद होईल.
अनमोल मार्गदर्शन केले, तसेच रोडगे सरा म्हणाले हा काव्य संग्रह नसून तो एक महाकाव्य ग्रथ असे प्रतिपादन केले .
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन
मानसी पाटील यांनी केले
आभार सिद्धार्थ साखरे सर यांनी मानले
या कार्यक्रमाच्य्या यशस्वी करीता
आयु.राजकुमार देशपांडे सर
तसेच राजेंद्र बनसोड सर
छोटी बागडे, बादल शेद्रे
याचे मोलाचे सहकार्य मिळाले