अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना हिंगणघाट शहरातील नंदोरी चौक परिसरात एका गाडीतून जवळपास 2 लाख 50 हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नाकाबंदी दरम्यान हिंगणघाट शहरातील नंदोरी चौक जवळ एका वाहनातून मोठी रक्कम पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे.
पोलिस अधिक्षक अनुराग जैन वर्धा, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.सागर कवडे वर्धा, यांचे मार्गदर्शनाने तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत हिंगणघाट व पोलीस निरीक्षक मनोज गभाणे ठाणेदार पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोहवा यशवंत गोल्हर सोबत पो.न. नरेंद्र आरेकर, राकेश अष्टनकर, विकास अवचट, पोका. संदिप बदकी यांनी दि.15 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास नंदोरी चौक हिंगणघाट येथे सार्वत्रीक विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुसंघाने नाकेबंदी करीत असतांना एका पांढ-या रंगाच्या चारचाकी वाहन क्रमांक एम.एच 34 ए यु. 5160 ची तपासणी केली असता ईसम रविंद्र रामदास जिवतोडे वय 36 वर्ष रा.संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगनघाट यांचे ताब्यातुन 2,50,000 रूपये रोख रक्कम मिळून आली. ही रक्कम बाळगण्याबाबत त्याने उचित उत्तरे व पैशाची पावती व बिले सादर न करू शकल्याने विधानसभा निवडणुक 2024 अनुषंगाने सदर रक्कम तहसील कार्यालय हिंगणघाट येथील एफएसटी पथक क्र. 03 चे प्रफूल भोयर यांचे पथकास पाचरण करून पुढ़ील उचित कार्यवाही करीता जप्त नगदी 2,50,000 रक्कम देण्यात आली.

