अमरावती जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अचलपूर:- विधानसभा मतदार संघात आज सकाळ पासून मतदान मोजणीला सुरुवात झाली आहे. येते एकूण 23 फेरीत मतमोजणी सुरू असून 18 फेरी अखेर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि अचलपूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बच्चू कडू यांना जोरदार झटका बसला आहे. येथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवीण तायडे यांनी 19158 मताची आघाडी घेतली असून बच्चू कडू हे तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिरुध्द देशमुख हे असून त्यांना 18 व्या फेरी अखेर 52136 मते आहे तर बच्चू कडू यांना 49560 मते आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवीण तायडे यांना 71296 मते मिळाली असून ते 19158 मताची आघाडी घेऊन विजयाकडे वाटचाल करत आहे.