पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आज विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहिर झाले आहे. त्यात भाजपा महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धोबीपछाड दिली आहे. त्यात कामठी विधानसभा मतदार संघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते महाराष्ट्राच्या 48 व्या विधानसभा क्षेत्र कामठी मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून सुरेश भोयर तर भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चुरशीच्या लढतीत झाली. अखेर या ठिकाणी लढती कामठी मतदारसंघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुलाल उधळला आहे.
कामठी विधानसभा मतदार संघात भाजपा प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने उमेदवारी दिली होती यांनी एकाहाती विजय मिळवला असून विरोधी काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांच्या 40946 मताने पराजय केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 174979 मते मिळाली असून सुरेश भोयर यांना 134033 मते मिळाली आहे. 40946 मताच्या फरकाने बावनकुळे विजय झाले आहे.
कामठी विधानसभेचा इतिहास : नागपुर जिल्हा मधील कामठी हे एक महत्वाची विधानसभा आहे. या विधानसभेवर बरेच वर्ष काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर 2004 मध्ये भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय मिळवला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकामागोमाग तीन विधानसभा निवडणूका जिंकल्या. त्यानंतर भाजपने दुसऱ्या चेहऱ्याला संधी दिली आणि टेकचंद सावरकर यांना उमेदवारी मिळाली. टेकचंद यांनीही 2019 च्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळला होता. त्यानंतर 2024 विधानसभा निवडणुकीत परत एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजपने विश्वास दाखवत उमेदवारी दिली आणि त्यांनी मोठ्या फरकाने विजयी झाले.