पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाले त्यात राज्यात परत एकदा भाजपा प्रणित महायुतीला मोठ्या प्रमाणात बहुमत प्राप्त झाले असून महाविकास आघाडीचा भुईसपाट झाला आहे. नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदार संघात 4 मध्ये भाजपाच्या शिलेदारांनी भगवा फडकवला असून दोन विधानसभा मतदार संघात काँग्रसने बाजी मारली आहे.
आज सकाळ पासून मतदान मोजणीला सुरुवात झाली होती. त्यात नागपूर हे आरएसएस चे मुख्यालय असून भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ नागपूर शहरात येत असल्याने सर्वाचा नजरा नागपूरच्या निकालावर लागल्या होत्या. त्यात भाजपाने 4 जागेवर विजयी फताका फडकवला असून 2 जागी काँग्रेस निवडून आली आहे.
नागपुर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघ: नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघात भाजपने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेस पक्षाने प्रफुल गुडघे यांना उमेदवारी दिली होती. त्यात बहुजन समाज पार्टीने सुरेंद्र डोंगरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनय भांगे हे उमेदवार म्हणून निवडणुक रिंगणात होते.
त्यात भाजपा उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी विजयश्री खेचून आणली आहे.भाजपा उमेदवार देवेंद्र फडणवीस यांना 129401 मते मिळाली असून विरोधी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल गुडघे यांना 89692 मते मिळाली आहे. तर बीएसपी उमेदवार संजय सोमकुवर यांना 2017 मते मिळाली आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सत्यभामा लोखंडे यांना 2728 मते मिळाली आहे. त्यात भाजपा उमेदवार मोहन मते हे 39710 मताने विजयी झाले आहे.
नागपुर पश्चिम विधानसभा मतदार संघ:
नागपूर पश्चिम विधानसभा मतदार संघात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपाने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली होती. त्यात अपक्ष म्हणून नरेंद्र जिचकार यांनी उमेदवारी दाखल केली तर बहुजन समाज पार्टीने प्रकाश गजभिये हे निवडणुक रिंगणात होते. त्यात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी विजयश्री खेचून आणली आहे.
काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना 104144 मते मिळाली असून विरोधी भाजपा उमेदवार सुधाकर कोहळे यांना 98320 मते मिळाली आहे. त्यात अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांना 8166 मते तर बीएसपी उमेदवार प्रकाश गजभिये यांना 3482 मते मिळाली आहे. तर त्यात काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे हे 5824 मताने विजयी झाले आहे.
नागपूर मध्य विधानसभा मतदार संघ: नागपूर मध्य मधून भाजपने प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेस ने बंटी शेळके यांना उमेदवारी दिली होती. त्यात रमेश पुणेकर हे पण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक रिंगणात होते. त्यात भाजपा उमेदवार प्रवीण दटके यांनी विजयश्री खेचून आणली आहे
भाजपा उमेदवार प्रवीण दटके यांना 90560 मते मिळाली असून विरोधी काँग्रस उमेदवार बंटी शेळके यांना 78938 मते मिळाली आहे. तर अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर यांना 23302 मते मिळाली आहे. त्यात भाजपा उमेदवार प्रवीण दटके हे 11632 मताने विजयी झाले आहे.
नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघ: नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघात भाजपने कृष्णा खोपडे यांना उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ज्ञानेश्वर पेठे यांना उमेदवारी दिली होती. त्यात पुरुषोत्तम हजारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवार आभा पांडे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक रिंगणात होते. त्यात भाजपा उमेदवार कृष्णा खोपडे यांनी विजयश्री खेचून आणली आहे.
भाजपा उमेदवार कृष्णा खोपडे यांना 163390 मते मिळाली असून विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस श.प चे उमेदवार ज्ञानेश्वर पेठे यांना 48102 मते मिळाली आहे. तर अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांना 11359 मते मिळाली आहे. तर आभा पांडे यांना 9402 मते मिळाली आहे. त्यात भाजपा उमेदवार कृष्णा खोपडे हे 115288 मताने विजयी झाले आहे.
नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघ: नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघात काँग्रेसने राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डॉ. नितीन राऊत यांना उमेदवारी दिली होती. तर भारतीय जनता पक्षाने डॉ. मिलिंद माने यांना उमेदवारी दिली होती. त्यात बहुजन समाज पार्टीने मनोज संगोळे यांना उमेदवारी दिली होती तर ओवेशी यांच्या ऑल इंडिया मजलीस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने कीर्ती डोंगरे यांनी उमेदवारी दिली होती. त्यात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी विजयश्री खेचून आणली आहे.
काँग्रेस उमेदवार डॉ. नितीन राऊत यांना 127877 मते मिळाली असून विरोधी भाजपाचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांना 99410 मते मिळाली आहे. तर बहुजन समाज पक्षाचे उमेदवार मनोज सांगोळे यांना 12487 मते मिळाली आहे. तर ऑल इंडिया मजलीस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन यांना 3819 मते मिळाली आहे. त्यात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत हे 28467 मताने विजयी झाले आहे.
नागपूर दक्षिण विधानसभा मतदार संघ: नागपूर दक्षिण विधानसभा मतदार संघात भाजपने मोहन मते यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेस पक्षाने गिरीश पांडव यांना उमेदवारी दिली होती. त्यात बहुजन समाज पार्टीने संजय सोमकुवर आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्यभामा लोखंडे या उमेदवार म्हणून निवडणुक रिंगणात होते. त्यात भाजपा उमेदवार मोहन मते यांनी विजयश्री खेचून आणली आहे.
भाजपा उमेदवार मोहन मते यांना 117526 मते मिळाली असून विरोधी काँग्रेस चे उमेदवार गिरीश पांडव यांना 101868 मते मिळाली आहे. तर बीएसपी उमेदवार संजय सोमकुवर यांना 1970 मते मिळाली आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सत्यभामा लोखंडे यांना 1890 मते मिळाली आहे. त्यात भाजपा उमेदवार मोहन मते हे 15658 मताने विजयी झाले आहे.