Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

महाराष्ट्र राज्यात धक्कादायक निकाल, माजी मुख्यमंत्री, मंत्र्यासह अनेक दिग्गज नेत्याचा पराभव.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 23, 2024
in नागपुर, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, विदर्भ
0 0
0
महाराष्ट्र राज्यात धक्कादायक निकाल, माजी मुख्यमंत्री, मंत्र्यासह अनेक दिग्गज नेत्याचा पराभव.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप मुख्यसंपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यात भाजपा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं निकालातून समोर आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार झटका बसला आहे. या विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालही लागले आहेत.

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, माजी मंत्री यशोमती ठाकूर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, हितेंद्र ठाकूर, भावना गवळी यांसारख्या नेत्यांना पराभवाचा सामना करवा लागला आहे.

राज्यातील काही धक्कादायक निकालांवर एक नजर टाकूया.

संगमनेर – बाळासाहेब थोरात यांचा पराजय. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात या दिग्गज नेत्यांल पराभवाचा झटका बसला आहे. संगमनेर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा 10 हजार 560 मतांनी पराभव केला आहे. त्यांना एकूण 1 लाख 12 हजार 386 मतं मिळाली तर काँग्रेसचे मातब्बर नेते बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 1 हजार 826 मतं मिळाली.भाजपमधून शिवसेना शिंदे गटात आलेल्या तरुण अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांना पराभवाची धूळ चारली आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारी नुसार संगमनेर विधानसभा मतदार संघात 75.19 टक्के मतदान झालं होतं. वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीने अमोल खताळ यांना मदत केल्याचं सध्यातरी दिसत आहे.

संगमनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रावर बाळासाहेब थोरातांचं एकहाती नियंत्रण आहे. त्यांनी तालुक्यात सहकारी साखर कारखाना, दूध उत्पादक संघ, शाळा, महाविद्यालये, इंजिनियरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज असं संस्थांचं मोठं जाळं निर्माण केलं आहे. असं असतानाही बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कराड दक्षिण: पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराजय लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत मात्र मोठा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा 39 हजार 355 मताधिक्याने पराभव केला आहे.

अतुल भोसले यांना एकूण 1 लाख 39 हजार 505 मतं मिळाली असून, पृथ्वीराज चव्हाण यांना 1 लाख 150 मतं मिळाली आहेत. एकूणच राज्यभर मतदारांनी काँग्रेसच्या विरोधात दिलेला कौल कराड दक्षिणमध्येही कायम राहिलेला दिसून येतो.

2014 साली पृथ्वीराज चव्हाण या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले होते. 2019 मध्येही अटीतटीच्या लढतीत त्यांनी 9 हजार 130 मतांनी अतुल भोसले यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत अतुल भोसले यांनी पराभवाची परतफेड केली आहे.

माहीम: राज पुत्र अमित ठाकरे यांच्या पराभव. आदित्य ठाकरेंच्या पाठोपाठ निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे.अमित ठाकरे यांना भाजपनं पाठिंबा दर्शवला होता. तरीही एकनाथ शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी अर्ज दाखल केला होता. भाजपा महायुती कडून सरवणकर यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबावही आणण्यात आला होता. त्यानुसार सदा सरवणकर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटायलाही गेले होते. पण राज ठाकरेंनी भेट नाकारल्यानं अखेर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. अखेर याचा फटका बसल्यानं अमित ठाकरेंची पिछेहाट झाल्याचं, म्हटलं जात आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांचा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या उमेदवारानं अमित ठाकरेंचा पराभव केला.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीत उभे राहिले त्यावेळी मनसेनं वरळीमध्ये उमेदवार दिला नव्हता. पण उद्धव ठाकरेंनी आमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिला होता. त्याचीही बरीच चर्चा झाली होती.

वांद्रे-पूर्व – झिशान सिद्दिकी यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी झिशान सिद्दीकी यांचा 11 हजार 365 मतांनी पराभव केला असून.

बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यूनंतर सहानुभूतीच्या बळावर झिशान सिद्दीकी निवडून येतील असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता पण पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या वरुण सरदेसाई यांनी झिशान सिद्दीकी यांचा पराभव केला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई यांना 57 हजार 708 मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या झिशान सिद्दीकी यांना 46 हजार 343 मतं मिळाली आहेत.

तिवसा – यशोमती ठाकूर यांचा पराजय काँग्रेसच्या आणखी एक मोठ्या महिला नेत्या यशोमती ठाकूर यांनाही या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या राजेश वानखेडे यांनी यशोमती ठाकूर यांचा पराभव केला. राजेश वानखेडे यांना 99664 मते मिळाली. तर यशोमती ठाकूर यांना 92047 मते मिळाली.

माजी मंत्री यशोमती ठाकूर सलग तीन वेळा तिवसा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांची विजयी कामगिरी रोखण्यात भाजपला यश आलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या ठाकूर अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्रीही होत्या. महायुती सरकारवर आक्रमकपणे टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. सलग तीनवेळा आमदार राहिलेल्या यशोमती ठाकूर यांच्यावर मतदारसंघात कामं झालेली नसल्यानं मतदारांची नाराजी होती. तसंच अमरावती मतदारसंघात झालेल्या ध्रुवीकरणाचाही त्यांना फटका बसल्याचं सांगितलं जातं.

वसई: हितेंद्र ठाकूर यांचा धक्कादायक पराजय वसई मतदारसंघाचं सहा वेळा नेतृत्व केलेले बहुजन विकास आघाडी पक्षाचे हितेंद्र ठाकूर यांना यावेळी मात्र निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपच्या स्नेहा पंडित यांनी हितेंद्र ठाकूर यांचा 3153 मतांनी पराभव केला.

निवडणुकीसाठी प्रचार थंडावल्यानंतर घडलेल्या एका घटनेनं हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर हे अचानक चर्चेत आले होते. हितेंद्र ठाकूर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना एका हॉटेलमध्ये ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं.

हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे. भाजपच्या राजन नाईक यांनी नालासोपारा मतदारसंघातून 36875 मतांनी त्यांचा पराभव केला.

अचलपूर: बच्चू कडू यांचा धक्कादायक पराभव विधानसभा निवडणुकांमधील आणखी एक धक्कादायक पराभव म्हणजे बच्चू कडू यांचा. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख अचलपूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बच्चू कडू यांचा प्रवीण तायडे यांनी अचलपूर मतदारसंघातून पराभव केला. बच्चू कडू हे 2004 पासून सलग चार वेळा अचलपूर मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र त्यांची विजयाची मालिका या निवडणुकीत खंडीत झाली.

अचलपूर विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार प्रवीण तायडे यांना 78201 मते मिळाली तर बच्चू कडू यांना 66070 मतं मिळाली. त्यांचा 12131 मतांनी पराभव झाला. तर काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांनी 15410 मतं मिळाली.

बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड करत गुवाहटी गाठली होती, त्यावेळी बच्चू कडू आणि त्यांच्या सोबत इतर काही अपक्ष आमदारही मविआच्या सरकारमधून बाहेर पडले होते. पण नंतरच्या काळात बच्चू कडूंना सत्तेत वाटा मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी महायुतीची साथ सोडत एकला चलो रे ची भूमिका घेतली होती. बच्चू कडू यांनी लोकसभेलाही महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली होती. विधानसभा निवडणुकीत तर युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या साथीनं परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी स्थापन केली होती. पण या आघाडीला विधानसभेत यश मिळालेलं दिसलं नाही. उलट बच्चू कडू यांना पराभवाचा सामना करावा लागला.

रिसोड: भावना गवळी यांच्या पराभव

राज्यात भाजपा, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंधीत महाविकास आघाडीच्या मोठा पराभव झाला असताना रिसोड विधानसभा मतदार संघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार भावना यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.

भावना गवळी या यवतमाळ लोकसभा मतदार संघातून पाच वेळा खासदार राहिल्या आहे. पण 2024 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेने रिसोड विधानसभा मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी दिली पण त्याचा काँग्रेसचे उमेदवार अमित झनक यांनी पराभव केला आहे.

काँग्रेसच्या अमित झनक यांना 76809 मते मिळाली असून दुसऱ्यास्थानी अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांना 70673 मते मिळाली आहे. तर भावना गवळी या चक्क तिसऱ्या स्थानी राहिल्या त्यांना 60693 इतकी मते मिळाली आहे. अमित झनक यांनी त्याचा 6193 मताने पराभव केला आहे.

Previous Post

कामठी विधानसभा मतदार संघात चंद्रशेखर बावनकुळे यांची काँग्रेस उमेदवाराला धोबीपछाड.

Next Post

नागपूर शहरातील 6 विधानसभा मतदार संघात 4 भाजपा तर 2 काँग्रेसच्या ताब्यात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर शहरातील 6 विधानसभा मतदार संघात 4 भाजपा तर 2 काँग्रेसच्या ताब्यात.

नागपूर शहरातील 6 विधानसभा मतदार संघात 4 भाजपा तर 2 काँग्रेसच्या ताब्यात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In