सतिश म्हस्के, जालना जिल्हा प्रतिनिधी
9765229010
जालना:- जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते विलास डोळसे यांच्यावर आकसबुद्धीने प्रशासनाने जो राजकीय दबावापोटी कुठल्याही प्रकारची शहानिशा चौकशी न करता थेट 302 सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी भीमसैनिकांनी जालना पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली.
जालना जिल्ह्यात अनुसूचित जाती जमातींवर केलेल्या हल्ल्यांचे असंख्य गुन्हे प्रलंबित असून आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यांना मात्र अभय दिल्या जातोय परंतु एक चळवळीतील माणूस ज्याच्या विरोधात सदरील प्रकरणात कुठलाही ठोस पुरावा नसतांना देखील 24 तासाच्या आत गुन्हा दाखल करून अटक केले जाते. करीता सदरील प्रकरणाची निःपक्षपाती पणाने चौकशी व्हावी यासाठी मराठवाड्यातून असंख्य प्रमुख नेत्यांनी व भीमसैनिकांनी जालन्यातील पोलिस अधीक्षक कार्यालय येथे धडक देत प्रशासनाला धारेवर धरले व जर पोलिसांनी यात एकसुत्री भूमिका घेतली तर लोकशाही, संविधानिक मार्गाने लढा उभारून १ लाख भीमसैनिकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा जालन्यातील भीम सैनिक यांच्या कडून करण्यात येणार अस महाराष्ट्र संदेश न्युजला दिलेल्या प्रेस रिलिज मधून माहिती देण्यात आली.