प्रशांत जगताप
वर्धा:- जिल्हातून एक खळबजनक घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या आकोली म्हसाळा येथून चार अल्पवयीन मुल बेपत्ता झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात एकच खळबळ माजली आहे. आता या सर्व मुलांचे अपहरण झाले की काही दुसर कारण आहे हे मुल मिळाल्या नंतर समोर येणार.
काल 2 ते 3 वाजताच्या सुमारास आकोली म्हसाळा गावातील चार अल्पवयीन मुल बेपत्ता झाली आहे. अंकुश देवळे वय 13 वर्ष, संदीप बुलानी वय 8 वर्ष, राजेश हेडाणी वय 13 वर्ष, राजेंद्र हेडाणी वय 14 वर्ष अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहे. या प्रकरणी मनोज देवळे यांनी सेलू पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
आकोली म्हसाळा गावातील चार अल्पवयीन मुल बेपत्ता झाल्याचे समोर आल्याने पोलिस हरकत मध्ये आली. या प्रकरणी तक्रार दाखल करून अज्ञात आरोपी विरुध्द भारतीय दंड संहिता कलम 363 अन्वये अपहरणाचा गुन्हा नोद केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
काही महिन्यापासून महाराष्ट्र वेगवेगळ्या स्थिकाणी मुलांना पळविणारी टोळी सक्रीय असल्याचे बोललं जात होते. यामुळं मुलांमध्ये तसेच पालकांमध्ये भीताचे वातावरण होते. दरम्यान, आकोली म्हसाळा गावातील चार पाशर्वभूमीवर असाच प्रकार घडल्याने अनेक चचेला वाव फुटले आहे.
मुलांचे अपहरण झाल्याच्या अफवेने पालकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून घबराट निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून मुले गायब झाल्याची, मुलांच्या अपहरणाची चर्चा प्रत्येक घराघरात सुरू आहे.
वर्धा जिल्हात नाकेबंदी..
चार अल्पवयीन मुल बेपत्ता झाल्याने पोलिसांनी वर्धा जील्हातून बाहेर जाणाऱ्या सर्व सीमा सिल केल्या आहे. सर्व सीमेवर नाकेबंदी करून प्रत्येक वाहनाची चौकशी करण्यात येत आहे. अशी माहिती सूत्रानी महाराष्ट्र संदेश न्युजला दिली आहे.