*मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचे हस्ते पुरस्कार प्रधान*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
गडचिरोली
विविध उपक्रम व शैक्षणिक कार्यासाठी दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोज सोमवारला शिक्षक लक्ष्मण रत्नम शिक्षक जि. प. उच्च प्राथ. शाळा येल्ला, पं. स. मुलचेरा यांना विनोबा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आयूषी सिंह यांनी रत्नम यांचा गौरव केला.
जि. प. गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आयूषी सिंह यांच्या संकल्पनेतून आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात ‘विनोबा ॲप’ पुरस्काराला सुरुवात झाली आहे. या माध्यमातून शिक्षकांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. विनोबा ॲपच्या माध्यमातून शाळा स्तरावर घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची देवाघेवान शिक्षक करू शकतात. साप्ताहिक, मासिक व वार्षिक केलेल्या कार्याचा तपशील एका क्लिकवर ते बघू शकतात.
लक्ष्मण रत्नम यांनी विनोबा ॲप वर ‘मजेशीर बलून गेम’ हा व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओला जिल्हाभरातून अधिकारी आणि शिक्षकांकडून लाईक व कॉमेंटचा वर्षाव करण्यात आला. त्यामुळेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात श्री लक्ष्मण रत्नम यांचा ‘विनोबा’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषद गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी मा. बाबासाहेब पवार उपशिक्षणाधिकारी मा. विवेक नाकाडे, विनोबा ॲपचे जिल्हा समन्वयक चंदन रापर्तीवार व गणेश शेंडे यानीं या वेळी उपस्थित होते.