अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २५:- सावनेर शहरातील ढोमणे ले आऊट वार्ड क्रं- १ येथिल रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक विठोबाजी कुथे यांचे वृद्धापकाळाने रविवार दि.२४ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता आपल्या राहते घरीच ८५ वा वाढदिवस साजरा करून निधन झाले.
विठोबाजी कुथे शिक्षक देशबंधू चित्तरंजन हायस्कूल कोथुर्णा येथून सेवानिवृत्त झाले होते. ते
माजी सचिव ग्रामविकास शिक्षण संस्थान कोथुर्णा, सेवानिवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष सावनेर तालुका अशी विविध पदे त्यांनी भूषाविली होती.
त्यांच्या मागे ३ मुले, १ मुलगी, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. त्याची अंत्येष्टी २५ नोव्हेंबरला राम गणेश गडकरी मोक्षधाम येथे दुपारी २ वाजता करण्यात आली.

