महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मलेशिया:- जगात शांती ही फक्त तथागत गौतम बुद्धाच्या विचाराने येऊ शकते कारण बुद्धाचे विचार हे सर्व प्राणी मात्रासाठी मंगलमय असून प्रेम, दया, शांती, करुणामय असल्यामुळे गरिबा पासून श्रीमंता पर्यंत सर्वच बुद्धाचे विचार आत्मसात करून आपले जीवन आनंदमय सुखमय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बुद्धाच्या विचारावर जीवन जगण्यासाठी प्रभावित होते आहे. त्यात मलेशियन टेलिकॉम टायकून आनंदा कृष्णन यांचा मुलगा वेन अजान सिरिपान्यो याने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी आपले श्रीमंत आणि आलिशान जीवनाचा त्याग करून संन्यास घेऊन गौतम बुद्धाच्या मार्ग निवडण्याची घोषणा केली आहे.
आनंदा कृष्णन मलेशियातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे 5 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे 40 हजार कोटींहून अधिक संपत्ती आहे. दूरसंचार, प्रसारमाध्यमे, उपग्रह, तेल, वायू आणि रिअल इस्टेट आदी क्षेत्रात त्यांचा व्यवसाय आहे. कृष्णन हे एकेकाळी आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जचे प्रायोजक असलेल्या एअरसेलचे माजी मालक आहेत.
बुद्ध भीखु बनलेले वेन अजान सिरिपान्यो यांचे बालपण गर्भश्रीमंतीत गेले. आता त्यांनी आपली आरामदायी आणि आलिशान जीवनशैली सोडून बौद्ध भीखू बनण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे वडील आनंद कृष्णन हेदेखील स्वत:ला एक समर्पित बौद्ध अनुयायी म्हणून स्वत:ची ओळख करून देतात. त्यांनी आपल्या मुलाच्या निर्णयाचा आदर केला आहे.
अजान सिरिपान्यो यांचे जीवन : अजान सिरिपानो यांचा संन्यासी जीवनाचा प्रवास वयाच्या 18 व्या वर्षी थायलंडच्या सहलीने सुरू झाला. थायलंडमध्ये आईच्या कुटुंबाला भेटायला जाताना त्यांनी आश्रमा मध्ये संन्यास घेऊन बौध्द भिखु बनण्याचा निर्णय घेतला होता. आज ते थायलंड-म्यानमार सीमेजवळ असलेल्या दाताओ दम मठाचे प्रमुख म्हणून राहतात. त्यांचे बालपण दोन बहिणींसोबत लंडनमध्ये गेले. तिथेच त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वाढलेल्या अजान सिरिपान्यो यांनी बौद्ध धर्माची तत्त्वे खोलवर समजून घेतली आहेत. वेन अजान सिरिपन्यो यांना आठ भाषांचे ज्ञान आहे. त्यांना इंग्रजी, तमिळ आणि थाई भाषेचेही ज्ञान आहे.
सामान्य जीवन : वेन अजान सिरिपान्यो हे भिखु सारखे साधे जीवन जगतात. ते भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतात. ते आपल्या कुटुंबाशीही जोडला जातात आणि कुटुंबाशी आपले संबंध टिकवून ठेवण्यासाठी ते नेहमी प्रयत्न पण करतात. बौद्ध धर्मात कौटुंबिक प्रेमाला महत्त्व देण्यात आले आहे. सिरिपन्यो आपल्या वडिलांना भेटण्यासाठी वेळ काढून या तत्त्वाचे पालन करतो. त्याच्या वडिलांनी त्याच्या सोयीसाठी पेनांग हिलमध्ये एक आध्यात्मिक रिट्रीट देखील खरेदी केली आहे.