अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतभर संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात येतो. संविधान दिनानिमित्त हिंगणघाट शहरात ‘वॉक फॉर संविधान’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान हक्क, न्याय, अधिकार दिले आहे. अशा संविधानाची समाजात जनजागृती व्हावी आणि सर्वांना त्याचे महत्व कळावे म्हणून हिंगणघाट शहरात भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान राजेंद्र प्रसाद यांच्या हाती देऊन राष्ट्राला अर्पण केले. 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या कल्याण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले असून त्यात प्रत्येक भारतीयाला न्याय अधिकार हक्क दीले आहे.
सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी विजय तामगाडगे व सहकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुध्द वंदना घेऊन या रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेली ही रॅली इंदिरा गांधी पुतळा चौक, सुभाषचंद्र बोस चौक, जयस्तंभ चौक, संत तुकडोजी चौक, तहसील कार्यालय चौक, महावीर भवन चौक, डॉ. रुबा चौकमार्गे जाऊन शेवटी डॉ.आंबेडकर चौकात समापन करण्यात आले.
ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे येताच भारतीय संविधान आणि संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या जयघोष करण्यात आला. यानंतर राष्ट्रगीत गाऊन 26/11 च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी हिंगणघाट शहरातील हजारो नागरिकांनी या सहभाग नोंदवला.
यावेळी विजय तामगाडगे, विनय शंभरकर, अनुला सोमकुंवर, संध्या जगताप, डॉ.निमेश कोठारी, सतीश धोबे, सुनील डोंगरे, सोनू गवळी, रसपाल शिंदेरे, शंकर मुंजेवार, प्रमोद अडलेवार, आशिष परबत यांच्यासह मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष सहभागी झाले होते.