धुळे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन धुळे:- जिल्ह्यातून एक संतापजनक माहिती समोर आली आहे. शिंदखेडा पंचायत समितीत विस्तार अधिकाऱ्याने एका महिला ग्रामसेविकेला शरीरसुखाची मागणी केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हात खळबळ उडाली आहे. यानंतर संतप्त महिला ग्रामसेविकेने विस्तार अधिकाऱ्याला काळ फासून चांगलाच चोप दिलाय. त्यानंतर महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदखेडा येथील विस्तार अधिकारी एस के सावकारे याने ग्रामसेविका महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती. शिंदखेडा पंचायत समितीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पंचायत समितीत एकच खळबळ उडाली आहे.
विस्तार अधिकार्याला काळे फासले: यानंतर संतप्त महिला ग्रामसेविका आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी विस्तार अधिकार्याला काळे फासत चांगलाच चोप दिलाय. त्यानंतर शिंदखेडा येथील विस्तार अधिकारी एस के सावकारेवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले.