Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

मुल येथे पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करावे, सुधीर मुनगंटीवार यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 28, 2024
in चंद्रपूर, तंत्रज्ञान, राजकीय, विदर्भ
0 0
0
मुल येथे पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करावे, सुधीर मुनगंटीवार यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आमदार सुधीर मुनगंटीवार यांची अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा.

सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुल, दि.28:- मुल तालुक्यात खाणकाम व्यवसायावर आधारित उद्योग व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात बुधवारी (ता.२७) मुंबई येथे मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण सहसचिव संतोष खोरगडे यांच्यासोबत बैठक घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच उच्च व तंत्रशिक्षण प्रधान सचिव यांच्याशी सुधीर मुनगंटीवार यांनी फोनवर सकारात्मक चर्चा केली.

चंद्रपूर जिल्हात ठिकठिकाणी खाणीचे उत्खनन सुरू असल्याने या जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख प्राप्त आहे. मुल तालुक्यामध्ये खाणकाम व्यवसाय व त्यावर आधारित उद्योग सुरू होत आहेत. त्यामुळे या उद्योगांना कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली आहे. परंतू या ठिकाणी उच्च तांत्रिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे उद्योगांना स्थानिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. उच्च व तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातील युवकांना इतर शहरांमध्ये जावे लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी गैरसोय होत आहे. परिणामी स्थानिक विकासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उद्योगासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता तसेच स्थानिक युवकांना तांत्रिक शिक्षण मिळून रोजगार उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने मुल येथे एक शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना केली.

यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेला चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. तसेच प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच मुल येथील पॉलिटेक्निक कॉलेजचा मार्ग मोकळा होणार आहे.

Tags: मुल येथे पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करावेमूल तालुकासुधीर मुनगंटीवार यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे मागणी.
Previous Post

विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेला शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळ फासून दिला चोप.

Next Post

राजुरा येथील आदर्श शाळेत बालविवाह मुक्त भारत अभियाना अंतर्गत सर्व विद्यार्थांना देण्यात आली प्रतिज्ञा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुरा येथील आदर्श शाळेत बालविवाह मुक्त भारत अभियाना अंतर्गत सर्व विद्यार्थांना देण्यात आली प्रतिज्ञा.

राजुरा येथील आदर्श शाळेत बालविवाह मुक्त भारत अभियाना अंतर्गत सर्व विद्यार्थांना देण्यात आली प्रतिज्ञा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In