महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंदिया:- जिल्हा तून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा-खजरी राष्ट्रीय महामार्गावरील वृंदावन फाट्याजवळ शिवशाही बस पलटून भीषण अपघात झाला यात 12 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
प्राप्त माहितीनुसार, रापम विभागाची शिवशाही बस पलटल्यानंतर आतापर्यंत 8 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांकडून अपघातग्रस्तांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा ते गोंदिया ही शिवशाही बस शुक्रवारी (दि.29) दुपारी भंडाऱ्याहून गोंदियाकडे जात होती. बस चालकाने एका दुचाकी मोटर सायकलला ओव्हरटेक करताना डव्वा गावाजवळ बस पलटून जवळपास 20 फूट रस्त्यापासून घासत गेली. त्यामुळे बसमधील 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 29 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डव्वा येथील गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच 108 रुग्णवाहिका माहिती देऊन सर्व जखमी प्रवाश्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिस स्टेशनचे अधिकारी फौज फाट्यासह घटनास्थळी पोहोचले आणि मदत कार्याला सुरुवात केली आहे. या अपघातातील जखमी व मृतक प्रवासी हे गोंदिया जिल्ह्यातीलच असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान भीषण अपघातामुळे गोंदिया-कोहमारा मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
या अपघातील 9 मृतांची ओळख पटली असून दोन मृतांची ओळख पटली नाही. पोलीस ओळख पटावी म्हणून शोध घेत आहे.
1) स्मिता सूर्यवंशी वय 32 वर्ष राह. मोरगाव अर्जुनी (पोलीस कर्मचारी)
2) मंगला राजेश लांजेवार वय 60 वर्ष राह. पिपरी जिल्हा भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार राह. पिपरी जिल्हा भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे वय 65 वर्ष, राह. वरोरा जिल्हा चंद्रपूर
5) रामचंद्र कनोजे वय 65 वर्ष राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा
6) अंजिरा रामचंद्र रामचंद्र कनोजे वय 60 वर्ष राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा
7) आरिफ अजहर सय्यद वय 42 वर्ष राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
8) अजहर अली सय्यद वय 55 वर्ष राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
9) नयना विशाल मिटकरी वय 35 वर्ष राहणार बेसा जिल्हा नागपूर