Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

विदर्भात शिवशाही बस पलटून भीषण अपघात 12 प्रवाशांचा जागीच मृत्यू, सर्वत्र रक्ताचा सडा, जीव वाचवण्यासाठी किंचाळ्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 29, 2024
in अपघात, क्राईम, भंडारा/गोंदिया, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
विदर्भात शिवशाही बस पलटून भीषण अपघात 12 प्रवाशांचा जागीच मृत्यू, सर्वत्र रक्ताचा सडा, जीव वाचवण्यासाठी किंचाळ्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंदिया:- जिल्हा तून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा-खजरी राष्ट्रीय महामार्गावरील वृंदावन फाट्याजवळ शिवशाही बस पलटून भीषण अपघात झाला यात 12 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार, रापम विभागाची शिवशाही बस पलटल्यानंतर आतापर्यंत 8 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांकडून अपघातग्रस्तांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा ते गोंदिया ही शिवशाही बस शुक्रवारी (दि.29) दुपारी भंडाऱ्याहून गोंदियाकडे जात होती. बस चालकाने एका दुचाकी मोटर सायकलला ओव्हरटेक करताना डव्वा गावाजवळ बस पलटून जवळपास 20 फूट रस्त्यापासून घासत गेली. त्यामुळे बसमधील 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 29 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डव्वा येथील गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच 108 रुग्णवाहिका माहिती देऊन सर्व जखमी प्रवाश्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिस स्टेशनचे अधिकारी फौज फाट्यासह घटनास्थळी पोहोचले आणि मदत कार्याला सुरुवात केली आहे. या अपघातातील जखमी व मृतक प्रवासी हे गोंदिया जिल्ह्यातीलच असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान भीषण अपघातामुळे गोंदिया-कोहमारा मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

या अपघातील 9 मृतांची ओळख पटली असून दोन मृतांची ओळख पटली नाही. पोलीस ओळख पटावी म्हणून शोध घेत आहे.
1) स्मिता सूर्यवंशी वय 32 वर्ष राह. मोरगाव अर्जुनी (पोलीस कर्मचारी)
2) मंगला राजेश लांजेवार वय 60 वर्ष राह. पिपरी जिल्हा भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार राह. पिपरी जिल्हा भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे वय 65 वर्ष, राह. वरोरा जिल्हा चंद्रपूर
5) रामचंद्र कनोजे वय 65 वर्ष राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा
6) अंजिरा रामचंद्र रामचंद्र कनोजे वय 60 वर्ष राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा
7) आरिफ अजहर सय्यद वय 42 वर्ष राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
8) अजहर अली सय्यद वय 55 वर्ष राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
9) नयना विशाल मिटकरी वय 35 वर्ष राहणार बेसा जिल्हा नागपूर

Tags: अपघातगोंदियाजीव वाचवण्यासाठी किंचाळ्या.बसचा अपघातभीषण अपघातविदर्भात शिवशाही बस पलटून भीषण अपघात 12 प्रवाशांचा जागीच मृत्यूसर्वत्र रक्ताचा सडा
Previous Post

चंद्रपूरच्या ‘फ्लाईंग क्लब’ साठी सुधीर मुनगंटीवार यांचा दिल्लीत पाठपुरावा, ऐरो क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष रुडी यांच्यासोबत चर्चा.

Next Post

एकनाथ शिंदे यांच्या एका अटीमुळे भाजपा अडचणीत, म्हणूनच सत्ता स्थापनेला होतो उशीर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
एकनाथ शिंदे यांच्या एका अटीमुळे भाजपा अडचणीत, म्हणूनच सत्ता स्थापनेला होतो उशीर.

एकनाथ शिंदे यांच्या एका अटीमुळे भाजपा अडचणीत, म्हणूनच सत्ता स्थापनेला होतो उशीर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In