उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- संपूर्ण भारतभर 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 75 व्या संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात डॉ. राजरत्न आंबेडकर प्रणीत भारतीय बौद्ध महासभा व लॉर्ड बुद्धा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त भव्य संविधान सन्मान रॅली काढण्यात आली.
भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान न्याय, हक्क आणि मूलभूत अधिकार दिले. भारतीय संविधानामुळे सर्व भारतीय एका धाग्यात गुंफून आहे. जात, धर्म, भाषा, आणि संस्कृती जोपासण्याची सर्वांना अधिकार दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या रक्ताच पाणी करून भारताला उत्तम असे संविधान दिले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना लिखित स्वरूपात संविधान देत राष्ट्राला अर्पण केले. या संविधानाच्या जनजागृती व्हावी संविधानरुपी ज्ञानवृक्षाचा पाया सर्वसामान्य नागरिकांना माहीत व्हावा म्हणून ही संविधान सन्मान रॅली काढण्यात आली.
या संविधान सन्मान रॅलीत डॉ. अरुण चक्रनारायण, देवीलाल तायडे, दिवाकर गवई, इरभानजी तायडे, बाळासाहेब अंभोरे, यशवंत इंगोले, प्रमोद तेलगोटे, निरश शिरसाट, उमेश इंगळे, जितेंद्र अहिर, सुनील तायडे, रमेश जवंजाळ, मधुकर शिरसाठ,पंजाबराव वानखडे, कैलास गवई, अरविंद तेलगोटे, भीमराव इंगळे, शिलवंत वानखडे, ओम इंगळे, मीनाक्षी तायडे, शोभा पाणतावणे, किरण चक्रनारायण, चंदा जवंजाळ, कोमल तायडे, गंगा गवई, सयाबाई शिरसाट, रुक्मिणी इंगोले, सोनाली वरठे, ज्योती दंदी, पायल दंदी, संजना दंदी, समता ताई, चंद्रकला तायडे, वनमाला अहिर, सविता तायडे, लक्ष्मी दंदी सह भारतीय बौद्ध महासभा, लॉर्ड बुध्दा फाउंडेशन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.