मानवेल शेळके, अहिल्यानगर उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- आशेचे द्वार प्रतिष्ठान पुणे या सामाजिक संस्थेमार्फत आज संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावातील गरजू महिला, निराधार महिला व गरजूना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
आशेचे द्वार प्रतिष्ठान पुणे ही संस्था नेहमी समाजकार्य करून समाजाला आपल देणं आहे असे कार्य करत आहे. त्यामुळे गरिबांचे दुःख जाणून या थंडीच्या महिन्यात फुटपाथवरील राहणार्या, रस्त्यावर झोपणार्या आणि गरीब व गरजू लोकांना मायेचा पदर म्हणून नवीन ब्लँकेट वाटप करण्यात आले. ब्लँकेट वितरण करताना आपल्याच समाजातील या दुर्लक्षित घटकांचे जगणे पाहून वाटत राहते की, आपण शैक्षणिक प्रगती केली, आर्थिक प्रगती केली तरीसुद्धा जोपर्यंत समाजात अशाप्रकारे गरिबांना कमालीचे त्याज्य जीवन जगावे लागत आहे, तोपर्यंत समाज प्रगती करतो, असे म्हणू शकत नाही अशी भावना प्रकट केली.
यावेळी 40 गरीब व गरजू महिलांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच श्री विष्णू पवार, गणेश वराडे उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष जोसेफ पवार, प्रशांत खवाडिया, सचिन जाधव, प्रदीप लोंढे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे कर्मचारी विजय दारोळे, सुभाष मुंन्तोडे, ज्ञानेश्वर कदम, अमोल खरात आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन दीपक शिंदे यांनी केले.

