युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्हात येणाऱ्या काटोल पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिर आणि वहिनीच्या अनैतिक संबंधातून भावानेचे आपल्या भावाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सत्येंद्र आणि संदीप असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. सत्येंद्र हा त्याच्या वहिणीच्या प्रेमात अक्षरश: बुडाला होता. त्यामुळे त्याने आपल्याच भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे.
अनैतिक संबंधातून भावाने भावाची हत्या केली आहे. त्यात मोठ्या भावाचे लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच दीर आणि वहिनीचे सूत जुळले. ती सुद्धा आपल्या नवऱ्यापेक्षा दिराला जास्त जवळ करायला लागली. पत्नीशी जवळीक साधताना लहान भावाला बघताच घरात वादाचा भडका उडाला. या वादातून लहान भावाने मित्राच्या मदतीने आपल्या मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने वार करुन हत्या केला.
बायको आणि भाऊ दिसले एकाच खोलीत: मोठा भाऊ शेतात गेल्यानंतर वहिणी आणि दिर दोघेही एकाच खोलीत बसलेले होते. त्यादरम्यान, शेतात गेलेला भाऊ तासाभरात परत आला. तो घरात गेला असता दोघांनाही त्याने एकाच खोलीत बघितले. त्याने बायकोला जाब विचारला असता डोळ्यातील कचरा दिर काढून देत असल्याचे तिने सांगितले. मात्र, बायकोच्या चारित्र्यावर त्याला संशय आल्यामुळे त्याने दुसऱ्या दिवशी घर सोडले.
लग्नापूर्वी पासूनच होती ओळख: सत्येंद्र आणि जितेश हे काटोल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील येणाऱ्या गावात सधन शेतकरी असून, शेतीच्या कामात दोघेही भावंडांनी लग्न केले नव्हते. शेवटी एका नातलगाच्या मदतीने 35 वर्षीय मोठा भावाचे लग्न तीन वर्षांपूर्वी एका नातेवाईक असलेल्या मुलीशी झाले. ती तरुणी नातेवाईक असल्यामुळे दोघेही भाऊ तिला लग्नाच्या पूर्वीपासून ओळखत होते.
घरी परत आला अन् झाला घात: दोन वर्षे बाहेरगावी राहणारा जितेश हा पत्नी व बाळासह पुन्हा गावी परत आला होता. त्यानंतर तो शेती करायला लागला. यादरम्यान वहिणी आणि दीराचे पुन्हा प्रेम फुलले. मोठ्या भावाने पत्नी व भावाला दोघांनाही मारहाण केली. त्यामुळे चिडलेल्या भावाने मित्र संदीप याच्या मदतीने भाऊ रात्रीला शेतात गेल्यानंतरच त्यांनी जितेशचा कुऱ्हाडीने वार करुन खून केला. काटोल पोलिसांनी मात्र २४ तासांच हत्याकांड उघडकीस आणले. दोन्ही आरोपीस अटक केली.