अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 1 डिसेंबर:- विद्युत विभागाच्या हलगर्जी कारभार सावनेर येथून परत एकदा समोर आला आहे. सावनेर विद्युत विभागाच्या या कारभारामुळे आज शहरात मोठी जीवितहानी टळली. अन्यथा मृत्युदेहाची रांग लागली असती. सावनेर येथे 30 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास बस स्टँडच्या मागील परिसरात असलेल्या साई मंदिरकडे जाणाऱ्या रोडवरील डॉ.कुंभारे यांच्या हॉस्पिटलला पेशंट घेऊन जाणारी बोलेरो पिकअप टाटा इंडिकॉमच्या टावर जवळील टर्निंग वर पोहोचल्यानंतर बोलेरो गाडीवाल्याला केबल लोमकळत असलेले वायर असल्याचे लक्षात आले नसल्यामुळे गाडीला केबल वायर लटकला आणि खिचल्या गेल्याने मोठा अनर्थ होता होता वाचला.
गाडीला वायर अटकून सिमेंटचा इलेक्ट्रिकल पोलला जबर झटका बसल्याने अर्ध्यातून तुटल्या गेला. इलेक्ट्रिक पोल वरच्या तारा सुद्धा तुटल्या गेल्या. यावेळी विद्युत करंटच्या प्रवाह सुरू असल्याने मृत्यूचा तांडव झाला असता. पण बोलेरो गाडीला अर्थिंग मिळाले नसल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच त्याच जिवंत विद्युत पुरवठा करणारा वायर तुटल्याने एसटी बसवर सुद्धा वायर तुटून पडला. यावेळी बस ड्रायव्हरने बस सोडून पळ काढला. त्याच रोडवर ढोले वेल्डिंग समोर कोचिंग क्लाससाठी येणारी मुले, छोट्या- मोठ्या गाड्यांचे, नागरिकांची वर्दळ सुरूच असते. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
यावेळी तात्काळ विद्युत पुरवठा बंद करून विद्युत वायर जोडण्यात आली. २ ते ३ तासानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. तोपर्यंत नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्या गेल्याची चर्चा ? जनतेतून सुरू आहे.