विश्वास वाडे, चोपडा तालुका प्रतिनिधी
चोपडा:- तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील गंलगीत मध्यरात्रीच्या सुमारास सावत्र मुलाने आईच्या डोक्यात दांडुक्याने जबर मारहाण केल्याने आई जागेवरती मृत्यू पावली या घटनेने अनेर परिसरात एकच खळबळ उडाली संशयीत दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यात मृतक महिलेचा नवरा व सावत्र मुलगा सामील आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून लाकडी दांडक्या जप्त केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार डोक्यामध्ये जबर प्रहार करून महिलेच्या जागेच मृत्यू झाल्याचे दिसून आले.
मगन वेचला पावरा वय 55 वर्ष याची पहिली पत्नी कलाबाई मगन पावरा वय 50 वर्ष एका वर्षांपूर्वी फाशी घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे मगन पावरा याने पंधरा दिवसापूर्वी एका महिलेला घरी घेऊन आला होता.
त्यात रविवार रात्री दारू पिऊन नऊ ते दहा वाजेपर्यंत आपसामध्ये भांडणे चालू होते. मगन पावरा याला दोन मुलं एक मुलगी असून ती विवाहित आहेत. रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविलाजात आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पीआय अवतार सिंग चव्हाण, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय वसावे, भरत नाईक, सुनील कोळी, राजू महाजन यांनी भेट दिली असून घटनास्थळी पंचनामा केला गलंगी येथील पोलीस पाटील चारुलता देवराज यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे माहिती कळवले चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

