सुरजागड येथील लोहखनिज नेण्याकरिता या भागात पक्के रस्ते व मोठे पुल होऊ शकतात तर आम्ही येथील रहिवासी असून आमच्यासाठी सरकार पुलाची व्यवस्था करू शकत नाही काय?, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांचा पुढाकार.
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही गडचिरोली जिल्हा विकासापासून वंचित असून आम्ही फक्त निवडणुकित मतदान करायचं काय? आमचं मतदान घेऊन आम्हालाच विकासापासून वंचित ठेवले जात आहे. अशा गंभीर आरोप एटापल्ली तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या एकरा (खुर्द) गावातील नागरिकांनी केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायत अंतर्गत लोह उत्खनन पहाडी सुरजागड जवळच असलेल्या एकरा (खुर्द) गावात स्वातंत्र्याचे इतके वर्षानंतर सुद्धा गावाला लागूनच असलेल्या मोठ्या नाल्यावर पुलाची मागणी करत आहे. परंतु, आजपर्यंत या गावातील नाल्यावर पुल मंजुर झाला नाही? आणि या गावातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात जगणार की मरणार अशी अवस्था होते? गावात येण्यासाठी अक्षरशा दरवर्षी पावसाळ्यात नावेचा वापर करावा लागतो? विद्यार्थ्यांना एटापल्ली येथे शाळा महाविद्यालय येथे शिक्षण घेण्यासाठी अडचण निर्माण होते. शाळा महाविद्यालयात पोहोचू शकत नाही. आजपर्यंत गावातील बिमार व्यक्ती, गर्भवती माता भगिनी यांचे किती तरी जीव गेले आहेत? परंतु आजपर्यंत या गावात अवागमन करण्यासाठी राज्य सरकारने पुल मंजूर केले नाही? या संपूर्ण गावातील नागरिकांचा येथील, प्रशासन व राज्य सरकार वर खूप मोठा रोष आहे?
राज्य सरकारकडे आजपर्यंत सदर पुल मंजुर करण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले, परंतु आजपर्यंत या गावाला दळणवळणाने जोडणारा सदर पुल मंजूर झाला नाही? आज या गावातील नागरिकांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रनय खुणे यांना गावकऱ्यांनी आपली समस्या व आपबिती सांगण्यासाठी बोलावले आणि त्या नाल्यावरच सर्व गावकऱ्यांनी एकत्रित होऊन आपली व्यथा मांडली.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे गावातील नागरिक यांनी गावातील रहदारीसाठी राज्य सरकार कडे सदर पुल मंजूर करण्याची मागणी केली व गावकऱ्यांनी बोलताना सांगितले आमच्या गावाजवळील सूर्जागड पहाडी वरील लोह खनिज उत्खनण्याच्या दळणवळणसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते आणि पुल राज्य सरकार तयार करीत आहे. मग आम्ही येथील स्थानिक रहिवासी असून राज्य सरकार आमची सोय सुविधा का करत नाही? असा सवाल केला आहे. यावेळी गावकऱ्यांनी राज्य सरकारने सदर पुल मंजूर न केल्यास येथील लोहखनिज प्रक्षेत्र येथे येणाऱ्या तोडसा ग्रामपंचायत अंतर्गत एकरा (खुर्द), झारेवाडा, पेठा, एकरा टोला या सर्व गावकऱ्यांचा विराट जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी एकरा (खुर्द) येथील नागरिक व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद सैयद व जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी व प्रामुख्याने गावकरी कन्ना नरोटी, मंगेश हलामी, बाजीराव गोटा, सुधाकर नरोटे, मनोज गोटा, सुरेश नरोटे, साधू गावडे सह शेकडो गावकरी आणी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.