Wednesday, April 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

शेतकरी बेरोजगार महापंचायत मध्ये मंजूर विषयानुसार योजनांचे नियोजन व्हावे: विदर्भ आघाडीचे अनिल जवादे यांची जिल्हाधिकाऱ्याना मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 4, 2024
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
शेतकरी बेरोजगार महापंचायत मध्ये मंजूर विषयानुसार योजनांचे नियोजन व्हावे: विदर्भ आघाडीचे अनिल जवादे यांची जिल्हाधिकाऱ्याना मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू, हिंगणघाट विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी विदर्भ विकास आघाडीचे वतीने शेतकरी बेरोजगार महापंचायत आयोजित करण्यात आलेली होती. या महापंचायतीला वर्धा लोकसभा खासदार अमर काळे, पदवीधर विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी, शिक्षक विधान परिषद सदस्य आमदार सुधाकर अडबाले या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत तथा राजरत्न आंबेडकर यांचे अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील जागरूक नागरिक यांचे उपस्थितीत परिसरातील शेतकरी व बेरोजगार तरुण-तरुणींच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी शेतकरी बेरोजगार महापंचायत मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कोरडवाहू शेतीला सिंचनाची बारमाही सोय आणि शेतमालाला c+50 या सूत्राप्रमाणे हमीभावात खरेदी व्हावी. शिक्षित तरुण-तरुणींना रोजगार मिळावा असे ठराव पारित करण्यात आले होते. शासनाने रुग्णालयाच्या मोठ- मोठया इमारती बांधायचा खर्च केला, पण डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ, उपकरणे व औषधांच्या सुविधा पुरवल्या नाहीत. सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या पूर्ण सुविधा पुरविण्याचे नियोजन व्हावे.

गोर, गरीब ग्रामीण जनतेच्या शिक्षणाची अवस्था फार वाईट आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समिती, ग्राम पंचायत स्तरावरील शाळांच्या ईमारतींची अवस्था अतिशय बिकट आहे. या शाळा चालू राहतील ,त्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे देता येईल त्याकरिता सरकारने ग्रामीण भागातील शाळा कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. त्या शाळा सुसज्ज व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचे ठिकाण व्हावे असे नियोजन करावे. हिंगणघाट व समद्रपुर परिसरातून वेना, पोथरा, यशोदा या नद्या वाहतात. या परिसरातील शेतकरी बहुसंख्येने कोरडवाहू शेतीधारक आहेत. त्यांच्या शेतीला बारमाही सिंचन उपलब्ध झाले पाहिजे. याकरिता सर्वसमावेशक नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील नद्यांचे सर्वेक्षण करून सिंचनाची सोय करण्याचे नियोजन करण्यात यावे. तसेच या नद्यांच्या दोन्ही बाजूंच्या काठावरील गावांना जोडणारे ब्रिज कम बंधारा, ज्यात किमान पाच एम सी एफ टी पाणी साठविण्यात येईल या पद्धतीचे सर्व गावांना ब्रिज कम बंधारे तयार करण्यात आले तर दोन्ही गावातील वाहतूक सुरू होईल. तसेच साठवण्यात येणाऱ्या पाण्यातून त्या परिसरातील जमिनीतील पाण्याची पातळी उंचावेल त्यातून शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल असे नियोजन करावें.

वरील सर्व विषयांची योजना तयार करून जिल्हा नियोजन सभेत मंजूरी प्राप्त करावी, यासाठी आवश्यक ती पूर्तता होईल अशी अंमलबजावणी करावी असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे. यावेळी विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांच्यासोबत गोरख भगत आणि महेश माकडे हे उपस्थित होते.

Tags: Anil jawadeशेतकरी बेरोजगार महापंचायत मध्ये मंजूर विषयानुसार योजनांचे नियोजन व्हावे: विदर्भ आघाडीचे अनिल जवादे यांची जिल्हाधिकाऱ्याना मागणी.हिंगणघाट
Previous Post

हिंगणघाट: माजी आमदार राजू तिमांडे आणि सुधीर कोठारी यांच्यावर मोठी कारवाई, पक्षाने केलं निलंबित.

Next Post

गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्प जवळ असलेल्या एकरा (खुर्द) गाव स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही पूला पासून वंचित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली: एटापल्ली  तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्प जवळ असलेल्या एकरा (खुर्द) गाव स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही पूला पासून वंचित.

गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्प जवळ असलेल्या एकरा (खुर्द) गाव स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही पूला पासून वंचित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In