सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन राजुरा:– दि.01 डिसेंबर रोज रविवारला यंग मेन्स बुदिस्ट वेलफेअर असोशीयन राजुरा येथील बुध्द विहार इथे प्रवचन मालिका तथा सत्कार समारोपिय निमित्त प्रबोधनचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचा सुरवातीला तथागत गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार मेणबत्ती अगरबती लाऊन दीप प्रजलित करण्यात आले व सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात भीमराव साव संस्कार उपाध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन झाले प्रमुख मार्गदर्शक अशोक घोटेकर विदर्भ प्रदेश अध्यक्ष व संघटक, किशोर तेलतुंबडे जिल्हाध्यक्ष, शंकर वेल्हेकर, कैविस मेश्राम, प्रगती मेश्राम, सुजाता लाटकर, धर्मुजी नगराळे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले आहे.
या पूर्वी सतत तीन महिने वर्षावास प्रवचन मालिका घेण्यात आले त्या नंतर समारोपीय कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्यामध्ये बौध्द धमाच्या प्रचार प्रसार करण्याकरीता चौवीस प्रकारचे शिबिरामधून भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्याच्या पदाधिकारी कडून प्रबोधन करण्यात आले. राजुरा तालुका मधील प्रत्येक विहार मध्ये. यावेळी किरण कुंभारे, वैशाली धोटे, कोल्हे यांनी आपले थोडक्यात मनोगत वक्त केले.
तत्पूर्वी भारतीय बौध्द महासभा तालुका राजुरा तर्फे सरचिटणीस गौतम चौरे यांची जेष्ठ कन्या मेघा प्रमोद पडवेकर गोवरी हिची आरोग्य विभाग पदी सरकारी दवाखाना गडचांदूर येथे निवड झाल्याबद्दल तिला पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस मंगलमय हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या त्यानतंर विशेष उपस्थित मध्ये संदीप सोनेने, प्रफुल भगत, गुरुबालक मेश्राम, नामदेव आवळे, गौतम चौरे, भीमराव खोब्रागडे, प्रभाकर लोखंडे, मुरलीधर ताकसांडे, इजी.राहूल भगत, किरण कुंभारे, सुजाता नळे, किरण खैरे, वंदना देवगडे, प्रणाली ताकसांडे, संगीता शेंडे, विलेखा उपरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे स्वागत गीत अशोक दुबे, प्रास्ताविक मेघाताई बोरकर, उत्कृष्ट संचालन संतोष कांबळे, आभार प्रदर्शन गौतम देवगडे यांनी केले या कार्यक्रमाला राजुरा तालुक्यातील बहुसंख्य संख्येने उपस्थित होते. शेवटी सरणत्य घेऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला.