Friday, May 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

तलाठी मुख्यालयी हजर राहण्याची मागणीसाठी जारावंडीतील महिलांचा महसूल कार्यालयावर धडक मोर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 5, 2024
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
तलाठी मुख्यालयी हजर राहण्याची मागणीसाठी जारावंडीतील महिलांचा महसूल कार्यालयावर धडक मोर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभूळकर आलापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जारावंडी:- जारावंडी परिसरातील महसूल प्रशासनाविरोधात आवाज उठवत काल सुमारे 200 महिलांनी महसूल कार्यालय, जारावंडी येथे भव्य मोर्चा काढला. तलाठी आपल्या मुख्यालयाला नियमितपणे हजर राहत नसल्याच्या मुद्द्यावरून महिलांनी प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना निवेदन देत ही समस्या त्वरित सोडवण्याची मागणी केली आहे.

जारावंडी परिसरातील नागरिकांना, विशेषतः महिलांना, सरकारी कामकाजासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तलाठी कार्यालयात वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींच्या नोंदी, सातबारा उतारे, आणि अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. यामुळे प्रशासना विरोधात महिलांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

मोर्चा दरम्यान महिलांनी एटापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांना फोनवर विचारणा केली की, तलाठी नियमित उपस्थित का राहत नाही? यावर तहसीलदारांनी उत्तर दिले की, तालुक्यात तलाठ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने काही तलाठ्यांना दोन साज्यांचा भार देण्यात आला आहे, त्यामुळे कामात दिरंगाई होत आहे. त्यांनी असेही सांगितले की, येथील कोतवाल कालिदास गेडाम हे आपले काम करून देतील.

मात्र, महिलांनी यावर आक्षेप घेतला आहे “जर कोतवाल तलाठ्यांचे काम करत असतील, तर नागरिकांचे प्रश्न खरोखर सुटणार का? परिसरात होत असलेल्या अवैध वाळू उपसा, खोदकाम आदी अवैध कामांवर कोण नियंत्रण ठेवणार?”

महिलांनी “तलाठी हजर नाही, कामे कशी पूर्ण होणार?” असा सवाल उपस्थित करत प्रशासनावर कडक टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर ही समस्या लवकरच सोडवली गेली नाही, तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा गंभीर ईशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात अनेक ग्रामस्थ महिलांसह सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते सहभागी झाले होते. त्यांनी महसूल विभागाला स्थानिक प्रशासनाच्या पारदर्शकतेबाबत जबाबदारी घेण्यास भाग पाडले.

Tags: आंदोलनगडचिरोली जिल्हाधिकारीतलाठीतलाठी मुख्यालयी हजर राहण्याची मागणीसाठी जारावंडीतील महिलांचा महसूल कार्यालयावर धडक मोर्चा.
Previous Post

नागपुरात जिवानिशी ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीवर स्कूलव्हॅन चालकाचा बलात्कार.

Next Post

हिंगणघाट येथे महामानव क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट येथे महामानव क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी.

हिंगणघाट येथे महामानव क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In