अनिल कडू, हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन हिंगणघाट:- शहरात महामानव क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हिंगणघाट येथे काजी वार्ड नगर परिषद वाचनालय चौक येथे बिरसा मुंडा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन दिलिप सिडाम मित्र परिवाराच्या वतिने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून छायाताई कुडमते, चंदाताई कुडमते, माजी प्राचार्य मोहता विद्यालय सुरेशराव वाटकर तर लोकजनशक्ति पार्टिचे वर्धा जिल्हा अध्यक्ष पत्रकार केशव तितरे, प्यारेलाल मेश्राम कार्यक्रमाचे आयोजक दिलिप सिडाम, वंदना सिडाम उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पाहुण्याच्या हस्ते महामानव कांतिसुर्य बिरसा मुंडा यांचे फोटोला मालार्पन व विश्वभूषन विश्वरंत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला मालार्पण व दिप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांने थोर पुरूषांवर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक दिलिप सिडाम जेष्ठ कार्यकर्ता यानी केले तर आभार सौ वंदना सिडाम यांनी मानले.
या कार्यक्रमाची सांगता भव्य भोजनदानाने करण्यात आली व सेवट थोर पुरूषांचा जयघोस करण्यात आला या कार्यक्रमाला नलिनी गेडाम कांचन आत्राम गिता मेश्राम, छाया कुडमते, मौसमी कादीकर, कला गेडाम, नलुबाई मडावी, मिनु गेडाम, सौनु मडावी, प्रियंका मडावी, स्नेहल सिडाम, कोमल सिडाम, समिर सिडाम, संदेश मडावी, विनायक सिडाम, प्यारेलाल मेश्राम, शंकर पिल्लेवार, निरज सांगोळे, नरेश मडावी, प्रगत तितरे व दिलिप सिडाम मित्र परिवारांचे वतिने साला बादा प्रमाणे याही साली भव्य भोजन दानाने सांगता करण्यात आली व जयघोस करण्यात आला.