मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
दिनांक :- ०७/१२/२०२४
गडचिरोली :- पासून 15 कि.मी. अंतरावर रा. कुरखेडा येथे शेतामध्ये काम करत असलेल्या गर्भवती महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. सदर घटना दिं. ६ डिसेंबर ला दुपारच्या सुमारास घडली.
मृतक महीलेचे नाव शारदा महेश मानकर (२५) होते.
सदर महिला जंगलालगत शेतामध्ये खऱ्यावर काम करत होती. परंतु जंगलामध्ये ठिय्या धरून बसलेल्या वाघाने सदर महिलेवर हल्ला चढवून तिला जागीच ठार केले. सदर घटनेची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांना मिळताच त्यांनी रा. कुरखेडा येथे भेट देऊन महिलेच्या अंत्यविधीला उपस्थित होते.
*_वनाधिकार्यांसोबत फोनवर चर्चा करुन वाघाचा बंदोबस्त व मुख्य रस्त्याच्या बाजूने असलेले झुडपे जंगल साफ करण्यास सांगितले.._*
अंत्यविधीला उपस्थित असताना गावकऱ्यांनी गावापासून ते हायवेपर्यंत जोडणाऱ्या रस्त्या वर झुडपी जंगल/ झाडे तयार झालेले असल्याचे सांगितले असताना.
प्रशांतजी वाघरे यांनी वनअधिकाऱ्यांना फोनवर संपर्क करून असली कुठलेही घटना पुन्हा घडू नये त्याकरिता आपण लवकरात लवकर नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करावे तसेच गावाच्या नजदीक व रत्याच्या कडेला असणाऱ्या झुडपी झाडांमुळे गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होतो व गावात जवळपास वाघ असल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याकरिता आपण एक-दोन दिवसांमध्ये रोडच्या आजूबाजूवरील 5 मीटर अंतरावरील झुडपी झाडे साफ करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले.