परभणी जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परभणी:- मध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आल्याने आंबेडकरी जनता आणि संविधान प्रेमी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होऊन तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या घटनेमुळे परभणीत हिंसाचार उफाळल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलिस महानिरीक्षक यांना फोन करुन आंबेडकरी वस्त्यांमधलं कोंबिग ऑपरेशन तातडीने थांबवण्याचं आवाहन केलंय. यासंदर्भातील ट्विट आंबेडकरांनी केलंय.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी दोनवेळा फोनवर संपर्क साधला आहे. तसेच आंबेडकरी वस्त्यांमध्ये सुरू असलेले कोंबिग ऑपरेशन तातडीने थांबविण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व समाजकंटकांना अटक करा, अन्यथा तर पुढील दिशा ठरवली जाईल असा इशारा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे दिला आहे.
तसेच या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाले आहे. दलितांच्या विरोधात सुरू असलेल्या अटका आणि दलित वस्तीवर सुरू असलेले कोम्बिंग ऑपरेशन तत्काळ थांबवावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलीयं. तसेच आंबेडकर यांनी सर्व दलित आणि संविधानवादी जनतेला शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक झाली नाही, तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असा इशाराही आंबेडकर यांनी दिला आहे.
परभणीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार काल घडलायं. या घटनेच्या परभणीतील आंबेडकरी अनुयायां कडून संताप व्यक्त केला जात असून निषेध व्यक्त करण्यासाठी अनुयायी रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून परभणी बंदची घोषणा देण्यात आली असून ठिक-ठिकाणी टायर जाळून निषेध केला जात आहे.
परभणी बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, दरम्यान आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाचे प्रतिकात्मक पुस्तक फाडल्याच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी घोषणाबाजी करत टायर पेटवून परभणी नांदेड महामार्ग रोखून धरला. मराठवाड्यातील परभणीत संविधान पुस्तिकेच्या विटंबनेनंतर जमाव आक्रमक झाल्याचं दिसतंय. पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक झाली. काही गाड्यांची मोडतोड देखील आंदोलकांनी केलीयं.