उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- 26 जानेवारी 2025 रोजी सांगलीमध्ये संविधान मार्च व संविधान सभा घेण्याचा विचार सांगली शहरातील संविधान प्रेमी आणि शाहू फुले आंबेडकर विचारधारेचे लोक एकत्र येत करीत आहे.
आज भारतीय लोकशाही धोक्यात आहे… भारतीय संविधान धोक्यात आहे… असा प्रत्यक्ष अनुभव गेली 10 वर्ष आपल्याला येत आहे… अशा परिस्थितीत आपला खरा स्वातंत्र्य दिन आपण प्रजासत्ताक दिन म्हणजेच भारतीय संविधान अंमलात आल्याच्या दिवस दरवर्षी नियमितपणे मोठ्या प्रमाणात साजरा करावा व त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार शंभर टक्के मान्य असणाऱ्या समाजातील घटकांना एकत्र करून सामाजिक व राजकीय परिवर्तन करण्याचा आपल्या परीने आपण प्रयत्न करण्याचा मानस आहे.
26 जानेवारी 2025 या दिवशी एक वाजता संविधान मार्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथून कार्यक्रम स्थळ म्हणजे भावे नाट्य मंदिर इथपर्यंत संविधानाची प्रत हातात घेऊन आपण समूहाने चालत जायचे आहे. त्यानंतर भावे नाट्यमंदिर मध्ये भारतीय संविधान सभा दुपारी 2.00 ते सायं 6.00 वाजेपर्यंत आयोजित करण्याचा विचार आहे. यात नियोजित वक्ते म्हणून डॉ.भालचंद्र मुणगेकर, सुषमा अंधारे, सुजात आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात येणार आहे.
भारतीय संविधान सभेचा विषय
1.भारतीय संविधानासमोरील सामाजिक आव्हाने.
2.भारतीय संविधाना समोरील राजकीय आव्हाने.
3.भारतीय संविधानासमोरील सांस्कृतिक आव्हाने
या कार्यक्रमासाठी संयोजन समिती स्थापन करण्यासाठी पहिली प्राथमिक बैठक सोमवारी दिनांक 16 डिसेंबर रोजी डॉ. सुधीर कोलप यांच्या डेंटल लॅब मध्ये सायंकाळी 6.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. वरील उपक्रम ज्यांना मान्य आहे व जे या संयोजन समितीत सहभागी होऊ इच्छिता त्यांची प्राथमिक बैठकित उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन या बैठकीचे निमंत्रक डॉ. नामदेव कस्तुरे, डॉ. सुधीर कोलप, आयु.दयानंद कोलप यांचा वतीने करण्यात आली आहे.