✒️श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड:- आज लाचखोरीच्या भस्मासूर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर येत आहे. अशीच एक लाचखोर तलाट्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहे. टॅक्स पावती न देता सातबारा फेरफार नोंद करण्यासाठी, 7 हजार रुपयांची लाच घेताना, तलाठ्यासह त्याच्या साथीदाराला, रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंबाजोगाई शहरात केली आहे. प्रफुल्ल सुहासराव आरबाड वय 30 रा.प्रशांतनगर अंबाजोगाई असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
याप्रकरणी अंबाजोगाई येथील तक्रारकरत्यानी या लाचखोर तलाट्या विरोधात तक्रार दिली होती. तक्रारदाराने खरेदी केलेल्या प्लॉटची सातबारा फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे कागदपत्रे सादर केली होती. टॅक्स पावती न देता सातबारा फेरफार नोंद करण्यासाठी, तलाठी प्रफुल्ल आरबाड यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने पठाण यांनी याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक पथकाला दिली. तक्रार प्राप्त होताच, लाचलुचपत विभागाने, काल सायंकाळी सापळा लावला.
२६ रोजी सायंकाळी एका बिअर बारच्या मागे एजंटासह तलाठी आरबाड दुचाकीवर आला. तक्रारदारास तलाठ्याने एजन्ट कडे पैसे देण्यास सांगितले. त्याने रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही झडप मारून पकडले. शहर ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अमोल धस, अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, चालक गणेश म्हेत्रे यांनी कारवाई केली.

