प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील सम्यक बुद्ध विहार, प्रबुद्ध नगर हिंगणघाट येथे दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी रविवारला हिंगणघाट शहरातील बुद्ध विहार पंच कमेटीला धम्मपद ग्रंथ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आदर्शांना यांच्या प्रतिमेला माल्यापॆण करून व बुद्धवंदना घेऊन सुरुवात करण्यात आली.
यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रलय तेलंग अध्यक्ष सम्यक बुद्ध विहार बौद्धपंचकमेटी, तथा माजी नगरसेवक होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक प्रा.प्रवीण कांबळे आंबेडकरी विचारवंत, तथा संपादक त्रैमासिक निळाई नागपूर, सूर्यकांत मुनघाटे कवी, गझलकार, छत्रपाल तामगाडगे, नरेश पाटील, शरद कांबळे, एस. आर. खेडकर सर माजी प्राचार्य यांची उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांचे पुष्प व पंचशील दुपट्टे प्रदान करून स्वागत करण्यात आले. धम्मपद ग्रंथ वितरण सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक प्रा. प्रवीण कांबळे यांनी मार्गदर्शन करताना मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्त्व विशद करताना सांगितले की बुद्धाच्या धम्मात मार्गशीर्ष पौर्णिमा फार महत्त्वपूर्ण मानली जाते याच पौर्णिमेला बुद्धाच्या धम्मात महिलांचा संघ निर्माण करण्यात आला. उदाहरणासह सांगितले तसेच पुढे बोलताना म्हणाले की, आंबेडकरी चळवळीचे अवस्था फार बिकट आहे. आपणच आपल्या माणसाचे पाय मागे ओढण्याचे काम करीत आहोत ही प्रवृत्ती आपण थांबवली पाहिजे व संघटितरित्या कार्य केले पाहिजे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून संघाच्या एकजुटीचे उदाहरण देऊन उपस्थितांना अमूल्य असे मार्गदर्शन केले.
विचार मंचावर उपस्थित इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये छत्रपती तामगडगे यांनी पंचशील व दानपारमीता यावर मार्गदर्शन केले. तसेच सूर्यकांत मुनघाटे कवी, गझलकार यांनी धम्मपद ग्रंथाविषयी विस्तृत माहिती दिली.
तसेच नरेश पाटील निळाई यावर मार्गदर्शन केले.. तसेच शरद कांबळे यांनी धम्मपद ग्रंथावर गीत सादर केले.
यावेळी विचारमंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रलय तेलंग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून भाष्य करताना सांगितले की, आपण इतरांना मोठे करणेकरिता आपली शक्ती, ऊर्जा खर्च घालतो हे थांबविले पाहिजे व सर्वांनी एकत्रित येऊन चळवळीला बळकटी दिली पाहिजे तसेच धम्मपद ग्रंथासारखे अनमोल ग्रंथाचे आपण सर्वांनी वाचन, पठन, चिंतन, मनन करून बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे.
यानंतर हिंगणघाट शहरातील एकूण १२ बुद्ध विहारातील महिला मंडळ व पदाधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. त्यामध्ये सम्राट अशोक बुद्धविहार, भीमनगर वार्ड, संबोधी बुद्ध विहार, लुंबिनी नगर, महाबोधी बुद्धविहार काजी वार्ड, कल्पतरू बुद्धविहार वीर भगतसिंग वार्ड, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भीमनगर वार्ड, यशोधरा बुद्धविहार महात्मा फुले वार्ड, सिद्धार्थ बुद्धविहार सिद्धार्थ नगर, जीवक बुद्धविहार आदर्श नगर, सुमेध बुद्धविहार महात्मा फुले वार्ड, श्रावस्ती बुद्धविहार प्रज्ञा नगर, रमाई बुद्धविहार तथागत नगर तसेच सम्यक बुद्धविहार प्रबुद्ध नगर इत्यादी बुद्ध विहाराला मान्यवरांच्या हस्ते धम्मपद ग्रंथ भेट देण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमिषा तेलंग यांनी अतिशय अभ्यासपूर्ण प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य अस्मिता भगत यांनी अतिशय काव्यमयतेतून बहारदार सूत्रसंचालन करून उपस्थितांना उदबोधन केले.
तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंद्रकला उमरे यांनी केले. हा धम्मपद वितरण ग्रंथ सोहळा यशस्वी करण्याकरिता भिमाबाई झांमरे, कांता मानकर, आम्रपाली भालशंकर, मनीषा खेडकर, विशाखा भोंगाडे, रेखा इंदुरकर, मनोरमा बनसोड, तक्षशिला जामूनकर, बबीता ढेपे, अमित झांबरे, शाहरुख बक्ष, चिंतामण रिंगणे, सुधीर रिंगणे, केशव उमरे,सुधीर लिहितकर सुरेश ढेपे सर इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.