भंडारा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- जिल्हातून एक मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे. तुमसर तालुक्यातील डोंगरी बुज येथे एक 4 वर्षाच्या चिमुकल्याचा उकळत्या पाण्याच्या बादलीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रिधाणा प्रमोद शेंद्रे वय 4 वर्ष रा. डोंगरी बुज. असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
सकाळी रिधाणा शेंद्रे हा चिमुकला आपल्या घरी खेळत होता. खेळत असताना तो स्वयंपाक खोलीमध्ये ठेवलेल्या उकळत्या पाण्याच्या बादलीत पडला. त्यात त्याचे शरीर गळ्यापासून पायापर्यंत गंभीररित्या भाजल्या गेले. त्यांला गंभीर स्थितीत तुमसरच्या उपजिल्हा नेण्यात आले परंतु त्याची स्थिती बघून डॉक्टरांनी त्याला भंडारा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात सांगितले. तिथून त्याला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोबरवाही पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
आपल्या चार वर्षाच्या मुलाचा अशा प्रकारे दुःखद मृत्यू झाल्याने रिधाणा यांचा आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.