अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2024 ला यवतमाळ शहरामध्ये राष्ट्रीय युवा क्रीडा महोत्सव 2024 आयोजित करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवामध्ये विविध खेळांचा समावेश होता, त्यामधील तायक्वांदो या खेळामध्ये मातोश्री मार्शल आर्ट क्लबचा भारत विद्यालय हिंगणघाट येथील विद्यार्थी यश गिरीश इंगळे वर्ग 9 याने 38 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकावले, व त्याची निवड नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
मिळालेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गोकुलदास राठी, उपाध्यक्ष श्यामभाऊ भिमनवार, सचिव रमेश धारकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजू कारवटकर, उपमुख्याध्यापक हरीश भट्टड, पर्यवेक्षक विनोद नांदुरकर, पर्यवेक्षिका सौ बुरीले मॅडम, क्रीडा विभाग प्रमुख विनोद कोसुरकर, क्रीडाशिक्षक संदीप चांभारे, संजना चौधरी तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व प्रशिक्षक गौरव खिराळे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ वर्धा चे सचिव श्याम खेमस्कर व कोचेस आणि इतर पद अधिकारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.