सौ.हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694
बल्लारपूर:- पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ तर्फे ” विद्या वाचस्पती सारस्वत सम्मान ” समारोह चे भव्य आयोजन रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी होटल सायाजी, विजयनगर इंदौर (मध्य प्रदेश) मधे केल्या गेले होते.
या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे मान. श्री. देवेंद्र कुमार जैन सेवानिवृत्त न्यायाधीश म. प्र. शासन भोपाल, विशिष्ट पाहुणे मान. श्री. विष्णुकांत कनकने तकनीकी प्रदेश प्रभारी मुख्यमंत्री उदय योजना शिक्षा विभाग म. प्र. शासन भोपाल, प्रमुख वक्ता मान. सुश्री दीपा मिश्रा सुप्रसिद्ध कथा- वाचिका वृंदावन धाम मथुरा, विशिष्ट सानिध्य मान. डॉ. विश्वनाथ पाणिग्रही राष्ट्रीय पर्यावरणविद एवं वर्ल्ड रेकॉर्ड धारी बागबाहारा जिल्हा महासमुंद( छत्तीसगड), विशिष्ट पाहुणे
मान. डॉ. शिवाजी शिंदे महाराष्ट्र राज्य संयोजक पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ इत्यादी विद्वतजनों च्या हस्ते श्री. राजू वानखेडे सहाय्यक शिक्षक जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर यांना शाल, मेडल, डिग्री ( पीएचडी) ने
सम्मानित केल्या गेले.
श्री. राजू वानखेडे यांनी सम्मान चे श्रेय डाॅ. एस. प्रकाश संयोजक, संस्था सचिव डॉ. अशोकराव जीवतोडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री. राजेश पाताळे, मार्गदर्शक प्रा. गणेश पेटकर, मुख्याध्यापक श्री. बी. बी. भगत, शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थ्यांना दिले आहे.