मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
सिरोंचा : या देशात शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचारच तारणारे असल्याचे प्रतिपादन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
25 डिसेंबर रोजी स्थानिक परीवर्तन भवन परीसर शाहूनगर येथे मिलिंद बहुद्देशीय विकास मंडळ व नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित फुले शाहू, आंबेडकर महोत्सवात परीसंवाद कार्यक्रमाच्या उद्घाटनीय स्थानावरून ते बोलत होते. तत्पूर्वी विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूनीक तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी नतमस्तक होऊन वंदन केले.
परिसंवादाचे विषय ‘दक्षिण मध्य भारतात परिवर्तन भवन ची भूमिका व कार्य’ आणि ‘भारतीय संविधान व समाज चेतना’ हे होते. परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पेंटा रामा तलांडी तर विचार पिठावर प्रमुख अतिथी म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, डॉ. मिताली आत्राम, सामाजिक कार्यकर्त्या निता तलांडी, नगरसेवक सतीश भोगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मधुकर कल्लुरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समय्या पसुला, जगदीश रालबंडीवार, सत्यनारायण परपटलावार आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता नष्ट करून देशात समानता प्रस्थापित केले असून या देशात शिव, फुले, बिरसा मुंडा, आंबेडकरांचे विचारच तारणार असल्याचे मत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त करून फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे महोत्सव होणे काळाची गरज असल्याचे म्हणत मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कार्सपल्ली यांनी तर उपस्थितांचे आभार शंकर कावरे यांनी मानले