*हजारोच्या संख्येने सहभागी झाले समाज बांधव*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
चामोर्शी-:
परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांनी मारहाणीत झालेला मृत्यू.देशाचे गृहमंत्री मा.अमित शहा यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी संसदेतील अवमान जनक वक्त्यव्य तसेच बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील मराठा समाजातील तरुण सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या या सर्व घटनांच्या विरोधात सर्वपक्षीय व सामाजिक संघटनेच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या वेळीस समितीच्या वतीने धडक मोर्चा हजारोच्या संख्येने महिलां व पुरुषांचा मोर्चा २३ डिसेंबर रोजीचामोर्शी येथीलउपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला त्यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमित रंजन यांना निवेदन देण्यात आले विविध मागण्यासाठी सर्वपक्षीय निषेध मोर्चा आयोजन आले समितीच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता हा धडक मोर्चा चामोर्शी नगर पंचायत बाजार चौक येथून शहरातील प्रमुख मार्गांनी हजारोच्या संख्येने घोषणा देत मोर्चा निघून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर करून त्या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद भगत, कुणबी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर पाल.डॉ.सुरपाम.मदन उंदिरवाडे.चंद्रगुप्त कोटांगले.राज बनसोड.अतुल येलमुले.डी.एस रामटेके विनोद खोबे.श्याम रामटेके,सत्यवानसोरते.अँड.डीम्प्पल उंदीरवाडे.माणिक तुरे.आदींनी यानी मार्गदर्शन करताना परभणी.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अवमान करणारे वक्तव्य.बीड जिल्ह्यातील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.या मोर्च्यात सम्यक बौद्ध समाज मंडळ आंबेडकर वार्ड चामोर्शी.मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड. जिजाऊ ब्रिगेड.प्रेरणा बौद्ध मंडळ चामोर्शी.जगतगुरू तुकाराम महाराज कुणबीसमाज व आदी संघटनांचा समावेश होता यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी हजारो संख्येनी उपस्थित होते पोलिसांचा चौक बंदोबस्त होता.

