Wednesday, April 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

पुणे: 8 व 9 वर्षीय दोन अल्पवयीन बहि‍णींवर अत्याचार करून निर्घृण हत्या, मृत्युदेह फेकले ड्रममध्ये.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 26, 2024
in Uncategorized, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे: 8 व 9 वर्षीय दोन अल्पवयीन बहि‍णींवर अत्याचार करून निर्घृण हत्या, मृत्युदेह फेकले ड्रममध्ये.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुणे जिल्हातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजगुरूनगर येथे घरा शेजारी राहणाऱ्या एका नराधमने 8 वर्षीय आणि 9 वर्षीय 2 अल्पवयीन बहि‍णींवर अत्याचार करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली असल्याने पुणे जिल्हात महिला आणि मुली सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. या हत्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी एका 54 वर्षीय नराधमाला बेड्या ठोकल्या आहे. या घटनेने संतापाची लाट उसळली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी हा एका स्थानिक हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतो आणि पीडित मुलींच्या शेजारीच राहतो, तसेत तो मुलींच्या कुटुंबियांना देखील ओळखत असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. 8 वर्षीय आणि 9 वर्षीय दोन मुलींचे मृतदेह बुधवारी रात्री त्यांच्या घराजवळील एका खोलीत पाणी साठवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ड्रममध्ये आढळून आले होते, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

बुधवारी दुपारी 1.00 वाजताच्या सुमारास या दोन मुली घरातील अंगणात खेळत होत्या. खेळत असतांना त्या अचानक गायब झाल्या. ही घटना घरच्यांच्या लक्षात आली. त्यांनी मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, मुली सापडल्या नाही. त्यामुळे या घटनेची तक्रार पोलिसांत देण्यात आली. संध्याकाळी पोलिसांनी देखील मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्या सापडल्या नाही. यानंतर पोलिसांनी मुलींचा घरातच शोध घेतला. यावेळी रात्री 10.00 वाजताच्या सुमारास वरच्या मजल्यावर एका पाण्याच्या ड्रममध्ये दोन्ही मुलींचा मृतदेह आढळला. दोन्ही मुलींचे पाय वर व डोकं खाली होतं. मुलीचे मृतदेह पाहून घरच्यांनई टाहो फोडला. पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली.

पोलिसांनी आरोपीविरोधात पुणे जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता आणि बाललैंगिक गुन्हे प्रतिबंध (पोक्सो) कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा उत्तर भारतात कुठेतरी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला एका लॉजमधून अटक करण्यात आली अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि हत्या केल्याच्या घटनेनंतर राजगुरुनगर येथील पोलीस स्टेशन बाहेर नागरिकांचा ठिय्या आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला. यावेळी मुलीच्या नातेवाईक आणि नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे.

Tags: MurderPune girl murderPune policeपुणे जिल्हात 8 व 9 वर्षीय दोन अल्पवयीन बहि‍णींवर अत्याचार करून निर्घृण हत्यामुलीची हत्यामृत्युदेह फेकले ड्रममध्ये.राजगुरूनगर पोलीस स्टेशन
Previous Post

परभणी घटनेच्या निषेधार्थ चामोर्शी येथे निघाला धडक मोर्चा.

Next Post

बीड मध्ये रक्षकच बनला चोर, चक्क एसपी कार्यालयातून पोलिसानेच चोरल्या 10 बॅटऱ्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बीड मध्ये रक्षकच बनला चोर, चक्क एसपी कार्यालयातून पोलिसानेच चोरल्या 10 बॅटऱ्या.

बीड मध्ये रक्षकच बनला चोर, चक्क एसपी कार्यालयातून पोलिसानेच चोरल्या 10 बॅटऱ्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In