भंडारा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- राज्यात महिला मुलीवर अत्याचार हत्याच्या घटना ताज्या असताना भंडारातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे राज्यात चाललं तरी काय ? आणि महिला मुली सुरक्षित आहे की नाही अशा प्रश्न निर्माण झाला आहे. भंडारा येथील एका शासकीय महिला नर्सिंग कॉलेजच्या प्रभारी मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींना उत्तीर्ण करण्यासाठी शरीर सुखाची मागणी केल्याच्या संतापजनक घटनेने खळबळ माजली आहे. किरण मुरकूट असे नराधम आरोपी प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव आहे.
भंडारा शासकीय महिला वैद्यकीय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना उत्तीर्ण करुन देण्यासाठी येथील प्रभारी मुख्याध्यापकाने शरीर सुखाची मागणी केली आहे. विद्यार्थिनीने घडलेली घटना आपल्या पालकांना सांगितल्यावर पालकांनी महाविद्यालयात येऊन त्या प्रभारी मुख्याध्यापकाला चोप दिला आहे. पाच ते सहा मुलींच्या व्हॉटसॲप वर मेसेज करून किरण मुरकूट नावाच्या प्रभारी मुख्याध्यापकाने त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. व्हॉटसॲप मेसेजचे प्रिंट आऊट पोलिसांकडे देण्यात आले आहेत.
प्रभारी मुख्याध्यापकाने अशा प्रकारचे कृत केले व आरोपी किरण मुरकूटे हा मुलींसोबत मागील अनेक दिवसापासून अश्लील वर्तन करत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितल्या नंतर संतप्त पालकांनी आक महाविद्यालयात येथून नराधम शिक्षकाला चांगलेच चोप दिला. त्यानंतर भंडारा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी प्रभारी मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या आहे.
आरोपी किरण मुरकूटे यांचे प्रताप समोर आल्या नंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मुख्याध्यापकाच्या रूमला सील केलं आहे. व किरण मुरकूट याच्या कडे असलेल्या चार्ज काढून घेण्यात आला आहे. त्याच्याविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.