Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

अर्थव्यवस्थेचा ‘सिंह’ मावळला! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 26, 2024
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, संपादकीय
0 0
0
अर्थव्यवस्थेचा ‘सिंह’ मावळला! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी दिल्ली:- भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. मनमोहन सिंह यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे अर्थ व्यवस्थेचे जनक असलेले मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर संपूर्ण जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

मागील काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणामुळे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे सक्रिय राजकारणा पासून दूर होते. आता त्यांचं निधन झालं आहे. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली.

2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ. मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले होते. 2008 साली अमेरिकेत मंदीमुळे संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात मंदीची लाट निर्माण झाली होती. पण डॉ. मनमोहन सिंह यांच्या ध्येय धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. त्यामुळे त्यांचे अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते अनेक नेत्यांनी डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर स्तुती केली होती. त्यानंतर 2009 मध्ये ते दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले.

डॉ. मनमोहन सिंह यांची कारकीर्द: डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला होता. 1947 साली भारत पाकिस्तान फाळणी नंतर विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं. डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली आहे.

सन 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 ते 1976 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं.

1982 ते 1985 या काळात त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केलं. त्यानंतर 1985 ते 1987 या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं.

सन 1991 सालाच्या आर्थिक संकटकाळी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली. अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्यात आलं. भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली.

सन 1996 साली मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2004 साली यूपीएची सत्ता आल्यानंतर डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाचे 13 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 2004 ते 2014 या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं. एप्रिल 2024 साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली होती.

Tags: Dr. Manmohan Singh LiveDr. Manmohan Singh Passes Awayडॉ मनमोहन सिंहडॉ. मनमोहन सिंग यांचे निधन
Previous Post

भंडारा शासकीय महिला नर्सिंग कॉलेजच्या प्रभारी मुख्याध्यापकाची विद्यार्थिनींना उत्तीर्ण करण्यासाठी शरीर सुखाची मागणी.

Next Post

परतूर तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखान्यातील भीषण स्फोटात दोन कामगार जागीच ठार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
परतूर तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखान्यातील भीषण स्फोटात दोन कामगार जागीच ठार.

परतूर तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखान्यातील भीषण स्फोटात दोन कामगार जागीच ठार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In