रविंद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात काम सुरू असताना गुरूवार, दि. २६ रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान सल्फर रसायन असलेल्या टाकीचा स्फोट झाल्याची माहिती असून या भीषण स्फोटात दोनजण ठार झाले आहेत. तर अन्य एक जण गंभीर झाल्याची माहिती देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार कारखान्यातील कामगार अशोक देशमुख व आबासाहेब पारखे असे दोन
कामगार ठार झाल्याचे सांगण्यात आले. कामगार नवनाथ पांढरपोटे रा. वरफळवाडी येथील गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच घटनाथळी परतूर पोलिस दाखल झाले. या घटनेत आणखी काही कामगार जखमी झाले आहेत का याची पाहणीही पोलिसांनी घटनास्थळी जाऊन केली. स्फोट कशामुळे झाला याचाही तपास पोलिसांनी सुरू केला असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

