पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूर एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत ऑटो रिक्षा अपघाताची घटना समोर आली आहे. या ऑटो रिक्षा अपघातात माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऑटो रिक्षाची दुभाजकाला जोरदार घडक बसली आणि तो पलटी झाला. यातच खासगी कार्यक्रमावरुन येत असलेल्या माय-लेकाचा मृत्यू झाला. ही घटना आज दि.27 डिसेंबर रोजी घडली आहे. आटो चालक रोहित साखरे व त्याची आई करुणा साखरे असं अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.
प्राप्त माहितीनुसार, एका खासगी कार्यक्रमावरुन येत असाताना रिक्षाची डिव्हायडरला धडक बसली. या अपघातात माय-लेकाचा मृत्यू झालाय. हिंगणा-वाडी बायपासवर मध्यरात्री 12 वाजता प्लास्टो कंपनी समोर आटो चालक रोहित साखरे व त्याची आई करुणा साखरे एक खाजगी कार्यक्रम आटोपून घरी जात असताना ही घटना घडली आहे. ऑटोवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव ऑटो आधी दुभाजकावर आदळला व उलटला यात चालक रोहित व मागच्या प्रवासी सीटवर बसलेली त्याची आई करुणा दोघांनाही डोक्यावर व हातापायाला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.