*प्रणय येगोलपवार यांच्या पुढाकाराने मोफत सेवा लाभ घेण्याचे आवाहन*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी:- प्रणय येग्लोपवार सर अहेरी येथे समाजसेवेचा उत्तम आदर्श घालून देत आहेत. संस्कार संस्था आणि आर्य गुरुकुलम गुजरात यांच्या मदतीने त्यांनी अहेरी येथील नागरिकांसाठी निःशुल्क सुवर्णप्राशन सेवा सुरू केली आहे. ही सेवा लहान मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. सुवर्णप्राशन हा आयुर्वेदिक उपचार प्रकार असून, त्यामध्ये विशिष्ट प्रमाणात सुवर्ण भस्म, औषधी तूप व हर्बल मिश्रण वापरले जाते, ज्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि त्यांचे सर्वांगीण आरोग्य सुधारते.
प्रणय सरांच्या या उपक्रमामुळे अनेक पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी मोठा आधार मिळत आहे. ही सेवा पूर्णतः निःशुल्क असल्यामुळे सर्वसामान्य लोकांनाही याचा लाभ घेता येतो. त्यांच्या या उपक्रमाबद्दल संपूर्ण गावात कौतुकाचे वातावरण आहे.
या सेवेसाठी संपर्क साधण्यासाठी व वेळापत्रक जाणून घेण्यासाठी स्थानिकांशी संपर्क साधावा.