मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
कमलापूर-येथील युवक राजू रतन मिस्त्री याने टपाल जीवन विमा निगम चे पॉलिसी एक लाख रुपयाचे विमा अभिकर्ता श्रीधर दुग्गीरालापाटी यांचेकडे काढले होते.काही महिन्यातच आकस्मित मृत्यू झाले असता त्यांची पत्नी कौशल्या राजू मिस्त्री यांना विम्याचे रक्कम बोनसहित एक लाख 14 हजार 28 रुपये इतके धनादेश देण्यात आले यामुळे पतीच्या निधनानंतर परिवाराला एक आर्थिक सहाय्य म्हणून उपलब्ध झाल्याने परिवारामध्ये आनंद व्यक्त होत आहे.भारतीय डाक विभागात विविध प्रकारच्या विमा उपलब्ध असून याचा लाभ घ्यावा असे आव्हान डाक विभागाचे निरीक्षक सुभाष जावडे यांनी आवाहन केलं धनादेश वितरण करताना कमलापूर येथील उपसरपंच सचिन ओलेटीवार माजी सरपंच रजनीता मडावी उपडाक निरीक्षक सिरोंचा सुभाष जावडे डाक सर्वेक्षक नावेद सय्यद पोस्टमास्टर कमलापूर नूतन मडावी डाक सहाय्यक वर्धन कुमार पोस्ट मास्तर सुधाकर गद्यलपल्लीवार दीपक आलम कार्तिक क्षीरसागर संचित मोहिते मनीषा आठवले अंजली वानखेडे सुजित नावे वैभव झाडे रितेश जयश सानिका स्वाती अनिल इत्यादी कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

