पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहनगर असलेल्या उपराजधानी नागपूरात मागील काही दिवसांपासून हत्याचे सत्र सुरू असून पोलिसांचा वचक आहे की नाही असे चित्र निर्माण झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्था नागपूरात पुर्णत चौफर झाली आहे. त्यात रविवारी जरीपटका येथील ख्रिश्चन कब्रस्थानातील रमेश शेंडे नामक चौकीदाराची निर्घृण हत्या करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार रविवार 29 डिसेंबर रोजी दुपारी 2.00 वाजताच्या दरम्यान एक तरुण हातात चाकू घेऊन जरीपटका येथील भारतीय प्रोटेस्टंट ख्रिचन कब्रस्थान येथे आला. तो सरळ चौकीदार रमेश शेंडे याच्या दिशेने चालत गेला. शेंडे यांचा हात पकडून काहीतरी विचारणा केली. त्यानंतर चाकूने रमेश शेंडे यांच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. याच वेळी कब्रस्थानात अंत्यविधीसाठी आलेल्या जेकब किरण यांनी धावत जाऊन त्या आरोपीला पकडले. तोपर्यंत रमेश शेंडे हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते.
मृतक रमेश शेंडे हे रक्ताच्या थारोळ्यात पाहून घटनस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी रमेश शेंडे यांना रुग्णालयात नेले तर आरोपीला याला जेकब किरण यांनी पकडून ठेवले. आरोपी पळून जाण्यासाठी झटापट करीत असतानाच किरण यांनी जरीपटका पोलिसांना फोन केला. आणि या हत्याकांडाबाबत माहिती दिली. काही वेळातच जरिपटका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सिंग तेथे पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेतले आणि घटनास्थळ पंचनामा करुन हत्याचा गुन्हा दाखल केला.
सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात या सलग पाच हत्येचा घटनेने नागपूर हादरली आहे. गेल्या आठवड्यातील पाचवे हत्याकांड आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी वाढलेली दिसून येत आहे.

