अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ३१ डिसेंबर:- शिक्षण विभाग जिल्हा परिषद नागपूर तर्फे ५२ व्या जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन वर्ष २०२४-२५ मध्ये सावनेर पब्लिक स्कूल गुजरखेडी सावनेर स्टेटबोर्ड ची विद्यार्थिनी कु.विधी अनिल अग्रवाल हिने उच्च प्राथमिक गटात तृतीय स्थान प्राप्त केले असून राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनी साठी पात्र झालेली आहे. तसेच शिक्षक गटामध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कु.पद्मा हिरटकर यांनी प्रथम क्रमांक पटकविला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, सचिव प्रतिभा जिवतोडे, संचालक रत्नाकरजी डहाके पाटील, मुख्याध्यापिका वैशाली देशपांडे (स्टेट बोर्ड), ममता अग्रवाल (सी.बी.एस.ई.), शिक्षक चंद्रकांत कोमुजवार, मंगला जोगी, अमोल जिवतोडे, अर्चना जयस्वाल, प्रज्ञा पाहुणे व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

