महालक्ष्मीचे काष्ट्यशिल्प भेट, कोरडी महालक्ष्मी दर्शनासाठी निमंत्रण, मोदी यांनी दिल्या संघटनात्मक टिप्स.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर प्रथमच पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची भाजपा प्रदेश अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्ली सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी बावनकुळे यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबेची काष्ठशिल्पातील मूर्ती भेट दिली. आई जगदंबेच्या दर्शनासाठी आपण यावे, अशी विनंती मोदी यांना त्यांनी केली.
महाराष्ट्रातील जनतेच्या भक्कम पाठिंब्यावर राज्यात भाजपा- महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाले आहे. पुढील काळात पक्षसंघटन अधिक मजबूत करून सरकारचा कारभार पारदर्शी आणि अधिक गतिमान करावा याबद्दल मोदी यांनी मार्गदर्शन केल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांची भेट आणि त्यांचे मार्गदर्शन नेहमी नवी ऊर्जा देणारे असते. ही अनुभूती आज पुन्हा एकदा आली. नरेंद्र मोदी यांना यावेळी नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपा संघटन पर्व कार्यशाळेच्या निमित्ताने दिल्लीत आले होते. गेले दोन दिवस त्यांनी भाजपा नेत्यांच्या भेटी घेतल्या.

